Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Thyroid

     Thyroid is a butterfly shaped endocrine gland situated in lower front of your neck. It has two side lobes each contains follicles which stores the thyroid hormones. Thyroid secrets several hormones, main hormone is thyroxin, also called T4. Importantly, and sadly, for over 10 million women across the globe, are suffering from Thyroid disorder. Earlier it was unusual for young women to have it. It was seen in women above age 40. However, according to research estimates, almost 30-35 % of younger women are affected with thyroid today.

      This small organ has enormous power over your body like operation manager in a company. It can control your weight; regulate your energy level, make your mood swing and might also create difficulty for you to conceive if you are planning for a baby! It sees that cells in the body are working properly. It does that by using hormones to deliver messages to every single cell of body. T3 and T4 hormones act like messengers to instruct each cells; when to consume Oxygen and nutrients which maintains body’s metabolism. The series of reactions are performed to provide us the energy. Hormonal notification from thyroid gets the heart pumping more efficiently. Make the cells to break the nutrients faster. When you need more energy thyroid helps by sending out hormones to increase metabolism. Ultimately thyroid allows our cells to use energy, grow and reproduce.

     The thyroid is controlled by pituitary gland - A hormonal gland deep in the brain that oversees the thyroid’s task. It makes sure when to send out its messengers. It senses the hormones in the blood are too low or too high. It sends out instructions in the form of TSH. Even in its tight control, however management sometimes sleeps out. Diseases grow in thyroid or chemical imbalances in the body confuse the organ and make it deaf to the Pituitary’s guiding commands.

     The first common cause is hyperthyroidism- which happens when the organ sends out too many hormones. That means the cells are overloaded with instructions to consume nutrients and Oxygen. As a result become overactive. Meaning a person with hyperthyroidism experiences a higher metabolism, faster heart rate, constant hunger rapid wt loss, they also feel hot, sweaty, anxious and difficult to sleep.

      The other problem is hypothyroidism- which happens when thyroid sends out very few TSH hormones. Meaning the body cells doesn’t have as many messengers to guide them, in response cells grow cells go listless and metabolism slows. People with hypothyroidism sees symptoms of wt gain, sluggishness, sensitivity to cold, swollen joints and feeling low.

Thyroid Diseases –

     1. Goitre – A general form of Thyroid swelling. It can be harmless, or can represent iodine deficiency or a condition associated with thyroid inflammation called Hashimoto’s Thyroiditis. 2. Thyroiditis – Inflammation of Thyroid, usually from a viral infection 3. Grave’s disease 4. Thyroid nodule 5. Thyroid cancer

      Conventional medication entails taking supplements of the hormone whereas Homeopathy for thyroid stimulates better functioning of the thyroid gland so that it can produce the hormone on its own.

     Homoeopathic Treatment in thyroid complaints – In Homeopathy, we provide constitutional medicine, which focuses on improving the function of the thyroid gland by natural means. The constitutional remedies will stimulate the body to reactivate thyroid secretions. In our Thyroid treatment we will help to boost energy, improve circulation and thereby help balancing hypo as well as hyperthyroid functions. Homoeopathic treatment for thyroid can also reduce the dependency on external supplementation of the hormones and ensure good health in general.

थायरॉईडविषयी तुम्हाला हे माहित आहे का?

      आज भारतात ४२ लाख महिला थायरॉईड संबंधित आजाराने बाधित आहेत. पूर्वी मुख्यतः चाळिशीनंतरच्या स्त्रियांमध्ये हे आजार दिसून यायचे. हल्ली मात्र ३०-३५ % तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये थायरॉईडशी संबंधित आजार दिसून येतात.

     थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची अंतःस्रावी ग्रंथी, आपल्या गळ्याच्या खालच्या भागात स्थित असते. हिचें दोन भाग असतात. त्यातल्या फॉलिकल मध्ये थायरॉईड हॉर्मोन साठवले जातात. थायरॉईड ग्रंथीतून बरेच हॉर्मोन स्रवले जातात त्यापैकी मुख्य म्हणजे T4 - थायरॉक्सिन.

      एखाद्या कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याप्रमाणे, ह्या लहानश्या ग्रंथीची आपल्या शरीरावर चांगलीच हुकूमत आहे. ही ग्रंथी तुमचे वजन, तुमच्यातील स्फूर्ती , तुमची मानसिक स्थिती इतकेच काय जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर त्यात देखील ही समस्या निर्माण करू शकते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींच्या कामावर हिची देखरेख असते. T3 आणि T4 हॉर्मोन जणू संदेशवहनाचे काम करतात. प्रत्येक पेशीला सूचना देतात - कधी प्राणवायू घ्यायचा कधी पोषकतत्वे शोषून घ्यायची आणि त्यामार्फत शरीरातील चयापचय नियंत्रित ठेवतात. आपल्याला ऊर्जा पुरवण्यासाठी बऱ्यचश्या क्रिया घडवून आणल्या जातात. थायरॉईड हॉर्मोनच्या सूचनेबरहुकूम हृदयाचे स्पंदन उत्तम रीतीने होते. जेव्हा तुम्हाला जास्त ऊर्जेची गरज असते तेव्हा थायरॉईड हॉर्मोनमार्फत चयापचयाचा वेग वाढवला जातो. अश्याप्रकारे ऊर्जा , वाढ, प्रजनन यासर्वावर थायरॉईडचे नियंत्रण असते.

     आपल्या मेंदूत स्थित पिट्युटरी ग्रंथी थायरॉईड ग्रंथीवर नियंत्रण ठेवते. रक्तातील T3 आणि T4 हॉर्मोनच्या पातळीवर ही लक्ष ठेवते. आणि TSH हॉर्मोनमार्फत थायरॉईड ग्रंथीला सूचना देते. पिट्युटॅरिची निगराणी असली तरी नियंत्रण कधी कधी ढासळते. थायरॉईडचे काही आजार किंवा शरीरातील रासायनिक असंतुलन यामुळे पिट्युटॅरिच्या सूचनांकडे थायरॉईड दुर्लक्ष करते..

      पहिले महत्वाचे कारण म्हणजे हायपरथायरॉईडीझम - यामध्ये जास्त प्रमाणात T3 आणि T4 स्त्रवले जातात. त्यामुळे पेशींवर पोषकतत्वे आणि प्राणवायू शोषून घेण्यासाठी सूचनांचा भडीमार होतो. परिणामी पेशी जास्तीचे काम करतात. म्हणजेच हायपरथायरॉईड असलेल्या व्यक्तीमध्ये चयापचयाचा वेग वाढतो,हृदयाचे ठोके वेगाने होतात. सतत भूक लागते तरीही वजन मात्र कमी होते. गरम होतं. घाम येतो. मनात हुरहूर वाटते. झोप येत नाही.

      दुसरा महत्वाचा आजार म्हणजे हायपोथायरॉईड. म्हणजे थायरॉईड ग्रंथीतून कमी प्रमाणात T3 आणि T4 स्त्रवले जातात. परिणामी पेशींना योग्य त्या सूचना दिल्या जात नाहीत. चयापचयाचा वेग मंदावतो. वजन वाढते.उत्साह वाटत नाही. थंडी वाजते. सांध्यांना सूज येते. उदास वाटते.

थायरॉईड्सही संबंधित आजार -

      १. गॉईटर - थायरॉईड ग्रंथीला सूज येते. कधी कधी ही आयओडीनच्या कमतरतेमुळे येते. २. थायरॉइडिट्स - थायरॉईड ग्रंथीला विषाणूंचा संसर्ग होणे. ३. ग्रेव्ह'स डीसीस ४. थायरॉईड नोंदूल ५. थायरॉईड कॅन्सर पारंपरिक (ऑलोपॅथिक) उपचारपद्धतीमध्ये थायरॉईड हॉर्मोन बाहेरून पुरवला जातो. तर होमिओपॅथीमध्ये थायरॉईड ग्रंथीला योग्य प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन तयार करण्यासाठी उत्तेजना दिली जाते.

      थायरॉइडच्या आजारासाठी होमिओपॅथी - होमिओपॅथीमध्ये आम्ही प्राकृतिक औषध देतो ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य नैसर्गिकरित्या सुधारते. थायरॉईड हॉर्मोन योग्य प्रमाणात स्त्रवण्यास चालना मिळते. होमिओपॅथिक उपचारांमुळे बाहेरून देण्यात येणाऱ्या हॉर्मोन्स वरील अवलंबित्वसुद्धा कमी करता येते आणि सर्वांगीण आरोग्य सुधारते.