Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Diabetes

     Diabetes ... everybody knows this word now days. 14 Nov is world Diabetes Day. Over 30 million have now been diagnosed with Diabetes in India. There are many health talk shows or news article provide information about it. Still there are misconceptions about this disease. Today, I will try to explain what diabetes is. It is one of the major hormonal diseases.

     Diabetes the term refers to group of symptoms characterised by high level of blood glucose. Too much sugar in the blood causes serious health problems, sometimes life threatening. There are 2 types of chronic diabetic conditions-

  1. Type 1 diabetes
  2. Type 2 diabetes,
  3. Gestational Diabetes – pregnant women can acquire a transient form of disease called gestational, after delivery.
  4. Prediabetes is when the blood sugar level is borderline, higher than normal but lower than diabetes. It may or may not progress to diabetes.

     During digestion carbohydrates break down into glucose which is then carried by the bloodstream to the various organ of the body. In healthy people beta cells of pancreas produce insulin. Insulin gets attached to target cells and induce glucose intake.

     In type 1 diabetes beta cells are destroyed by the immune system by mistake. The reason why this happens is not clear. Genetic factor are believe to play major role. Insulin production is reduced, less insulin gets bind to target cells. Less glucose is taken into the cells, more glucose stays into the blood circulation.

     Type 1 diabetes starts more early in life before age 20. It has sudden onset. In type 2 diabetes, pancreas produces enough insulin. But something goes wrong with receptor binding or insulin signalling inside the target cells. The cells are not responsive to insulin. Therefore cannot import glucose. Glucose stays in the blood.

      Genetic factor predispose susceptibility to disease. Lifestyle plays imp role. Typically, obesity, inactive & unhealthy lifestyle is associated with type 2. The symptoms appear gradually and mostly after age 30.

GENERAL SYMPTOMS OF DIABETES
  • Increased hunger
  • Increased thirst
  • Weight loss
  • Frequent urination
  • Blurry vision
  • Extreme fatigue
  • Sores that don’t heal
COMPLICAIONS OF DIABETES

     Long –term complications of diabetes develop gradually. Less controlled blood sugar for longer time leads to complications.

  • Cardio-vascular disease
  • Nerve damage
  • Kidney damage
  • Eye damage
  • Foot damage
  • Skin condition
  • Hearing impairment
  • Alzheimer’s disease
  • Depression

     Management of diabetes When we talk about diseases like diabetes, we talk in terms of management rather than cure. Homeopathic treatment along with intake of Allopathic drugs and/or insulin can prevent the progress and the complications associated with this condition. Moreover timely administered homeopathic medicines help in maintaining the levels of insulin and Allopathic drugs at minimum possible dosage and in preventing the further progress of the disease.

So where can homeopathy contribute to the management of diabetes?

     Type 1 diabetes – The role of homeopathy is restricted to controlling the complications of diabetes such as diabetic neuropathy, nephropathy, etc. Homeopathy does not have medicines that could stimulate the pancreas to secrete insulin in cases of Type I diabetes.

     Type 2 Diabetes - This can be helped by administering a “constitutional” remedy, based on the totality of the patient’s symptoms and characteristics. The effect will be to improve the general sense of well-being, to improve diabetes control, and maybe to lower the insulin or drug requirements.

मधुमेह

      मधुमेह हे नाव आजकाल सर्वांच्याच परिचयाचे आहे. आज 'जागतिक मधुमेह दिन'. आजच्या घडीला भारतात ३० लाखांहुनही जास्त लोकांना मधुमेह आहे. बऱ्याचश्या आरोग्यविषयक परिसंवाद आणि वर्तमानपत्रातील लेखांमधून मधुमेहाविषयी माहिती प्रसारित केली जाते तरीही मधुमेहाविषयी बऱ्याच गैररसमजुती आहेत असं आढळून येतं म्हणून आज मी मधुमेहाविषयी थोडी माहिती देणार आहे. मधुमेह हा एक हॉर्मोन्सशी संबंधित आजार आहे.

      मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे दिसणाऱ्या लक्षणांचा समुच्चय. ही लक्षणे गंभीर असतात आणि कधी कधी जीवघेणी ठरू शकतात. मधुमेहाचे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत.

१. मधुमेह प्रकार १
२. मधुमेह प्रकार २
३. गर्भारावस्थेत होणारा मधुमेह
४. मधुमेहपूर्व अवस्था -

      यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा जास्त असते पण मधुमेहातील प्रमाणापेक्षा कमी असते. कधी कधी याचे रूपांतर मधुमेहामध्ये होते. पचनक्रियेमध्ये अन्नातील कर्बोदकांचे रूपांतर साखरेत होते. ही साखर रक्तप्रवाहातून विविध अवयवांकडे पोहोचवली जाते. निरोगी लोकांमध्ये स्वादुपिंडातील बीटा पेशींमधून इन्शुलिन हॉर्मोन पाझरतो.इन्शुलिन टार्गेट सेलशी संलग्न झाल्यावर रक्तातील साखर पेशींमध्ये शोषली जाऊन विविध अवयवांना पोहोचवली जाते.

     मधुमेह प्रकार १ - शरीरातील रोगप्रतिकारप्रणालीच्या चुकीने स्वादुपिंडातील बीटा पेशी नष्ट केल्या जातात. असं का होतं हे अद्याप लक्षात आलेलं नाही. जनुकीय कारणांमुळे असं होण्याची दाट शक्यता असते. इन्शुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे कमी प्रमाणात इन्सुलिन टार्गेट सेलपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रक्तातील साखर कमी प्रमाणात पेशीमध्ये शोषली जाते. आणि जास्त प्रमाणात ती रक्तात राहते. मधुमेह प्रकार १ कमी वयातच म्हणजे २० वर्षांच्या आधीच दिसून येतो. तसेच तो अचानक सुरु होतो.

      मधुमेह प्रकार २ - यामध्ये स्वादुपिंडामध्ये पुरेसा इन्शुलिन तयार होतो. पण टार्गेट सेलशी संलग्न होणे किंवा पेशींना चेतावणी देणे यामध्ये काहीतरी घोळ होतो. त्यामुळे पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तातून साखर शोषून घेत नाहीत. त्यामुळे जास्त प्रमाणात साखर रक्तातच राहते.

     मधुमेहाची लक्षणे - - भूक वाढणे - तहान वाढणे - वजन कमी होणे - वारंवार लघवी होणे - धूसर दिसणे - अतिशय थकवा - न भरून येणाऱ्या जखमा

     मधुमेहामुळे होणारे बिघाड - बऱ्याचकाळापासून अनियंत्रित असलेल्या रक्तातील साखरेमुळे गुंतागुंत निर्माण होते. मधुमेहातील दीर्घकालीन बिघाड हळूहळू तयार होतात. - हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार - मज्जातंतूंना इजा पोहोचणे - मूत्रपिंड निकामी होणे - डोळ्याला इजा पोचणे - पायाला इजा होणे - त्वचा विकार - बहिरेपणा - विस्मुर्ती - नैराश्य

      मधुमेहाची हाताळणी v जेव्हा आपण मधुमेहासारख्या आजाराविषयी बोलतो तेव्हा आजार बरं करण्यापेक्षा आजार नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं ठरतं. होमीयोपॅथीक औषधांच्या बरोबरीने ऑलोपॅथिक औषधे आणि /किंवा इन्शुलिन घेतल्यामुळे मधुमेहाची तीव्रता तसेच गुंतागुंत रोखता येते. शिवाय होमिओपॅथिक औषधे योग्यवेळी घेतल्यामुळे इन्शुलिनची मात्रा समतोल ठेवता येते तसेच ऑलोपॅथिक औषधांचे प्रमाण कमी ठेवून आजाराची वाढही रोखता येते.

मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये होमीयोपॅथीच योगदान काय ?

      मधुमेह प्रकार १- होमिओपॅथीमध्ये स्वादुपिंडातून इन्शुलिन पाझरण्यासाठी उत्तेजना देणारं औषध नाही . त्यामुळे मधुमेह प्रकार १ मध्ये होमीयोपॅथीचा वाटा मर्यादित आहे. मधुमेहामुळे होणारे गुंतागुंतीचे आजार, जसे मज्जातंतूचे आजार, मूत्रपिंड निकामी होणे इत्यादी नियंत्रित ठेवणे.

      मधुमेह प्रकार २- होमिओपॅथिक प्राकृतिक औषध (कॉस्टट्यूशनल मेडिसिन) देऊन रुग्णाची मानसिक स्थिती सुधारता येते तसेच मधुमेहावर नियंत्रण मिळवून इन्शुलिन तसेच ऑलोपॅथिक औषधांची मात्रा देखील कमी करता येते. * होमिओपॅथिक प्राकृतिक औषध म्हणजे रुग्णाची लक्षणे, स्वभाव, वैशिष्ट्ये इत्यादीचा विचार करून शोधलेले औषध. याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर होमिओपॅथी या सदरात मिळेल. या सगळ्या औषधोपचाराबरोबरच पौष्टिक आहार आणि व्यायाम यांचेही मधुमेह नियंत्रित करण्यात खूप महत्त्व आहे.