Now days, we heard the term ‘hormonal imbalance’ frequently. What is it exactly? What are hormones?
Over the course of our lifetime, our body undergoes a series of extraordinary changes. We grow, experience puberty and reproduce. Behind the scene, our endocrine system works constantly for these changes. This system regulates everything from growth, sexual maturity and sleep to the rhythm of beating heart, impacting each and every cell of your body.
There are three main aspects – glands, hormones and cell receptors.
Glands- There are three hormone producing glands in brain and seven in your body. Each is surrounded by a network of blood vessels from which they extract ingredient to produce hormone.
Hormones- Hormones are then pump out, in tiny amount, into the blood stream. Each hormone needs to locate a set of target cells, in order to bring out a specific change.
Cell Receptors- Receptors are special proteins inside or on the surface of cells. Those receptors recognise the specific hormone as they pass by and bind together.
Hormone- receptor combination triggers many processes inside the cells and bring the changes how cell behaves. Endocrine system drives lots of changes across the body by exposing millions of cells at a time to hormones, in carefully regulated quantities.
E.g. thyroid gland produces T3 & T4 hormone. These hormones travel most of the body cells. Where they influence how quickly the cells use energy and how rapidly cells work. In term they regulate breathing rate, body heat and digestion.
Hormone play important role in puberty. In male, testes secrete testosterone that regulates the gradual development of sexual organs- sexual hair sprout, voice deepening and increased height. In females, oestrogen secrets from ovaries, it prepares body for menstruation or pregnancy.
Is that there are exclusively male and female hormones?
In fact men and women have Oestrogen and Testosterone just in different amounts. Both hormones play imp role in pregnancy as well along side 10 other hormones that ensure the growth of foetus and lactation and help mother to feed the child..
Hormonal changes are also associated with fluctuation in mood, because hormones can also influence production of certain chemicals in brain like Serotonin. When chemical levels shift, they may cause changes in mood as well. But that does not mean that hormones have unlimited power over us. They frequently viewed as main drivers about behaviour; making us slaves to their affects especially during puberty. But research shows that our behaviour is collectively shaped by a variety of influences including brain and its neurotransmitters, our hormones and variety of social factors.
The primary function of the endocrine system is to regulate our bodily processes not control us. Sometimes disease, stress and even diet can disrupt that regulatory function, altering quantity of hormones that the gland secretes. Or changing the way that cell responds. Diabetes is most common hormonal disorders occurring when the pancreas secrets too little insulin- the hormone that regulates blood sugar level. Hypo or hyperthyroidism occurs when the thyroid gland makes too little or too much thyroid hormone. Too little thyroid hormone results in slowed heart rate, fatigue, depression. Too much thyroid hormone causes wt loss, sleeplessness, irritability. But most of the time the endocrine system manages to keep our body in state of balance. And through its constant regulation it drives the changes that ultimately become who we are.
आजकाल आपण ' हॉर्मोन्सचे असंतुलन ' हे शब्द बऱ्याचदा ऐकतो. काय बरं असत हे? हॉर्मोन्स (संप्रेरके) म्हणजे नक्की काय?
आपल्या संपूर्ण आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये बरेचसे वैशिष्ट्यपूर्ण बदल घडून येतात. आपली वाढ होते, तारुण्य मग वार्धक्य. या सगळ्यामागे असते ती आपली अंतःस्रावी ग्रंथी (endocrine system). आपली वाढ, वयात येणं, झोप, इतकंच काय हृदयाचे ठोके या सगळ्या सगळ्यावर या संस्थेचे नियंत्रण असते. आता हे सगळं कसं घडून येतं ते समजून घ्यायचं तर ३ महत्त्वाच्या गोष्टी आहेत - ग्रंथी , हार्मोन्स, संवेदी चेतातंतूंचे टोक (cell receptors ).
अंतःस्रावी ग्रंथी - आपल्या शरीरात अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्यापैकी मेंदूंत ३ आणि शरीरात इतरत्र ७ ग्रंथी आहेत. यांच्याभोवती रक्तवाहिन्यांचे जाळे असते. या ग्रंथी रक्तवाहिन्यांमधूनच हवे ते घटक घेऊन हॉर्मोन्स म्हणजेच संप्रेरके तयार करतात.
हॉर्मोन्स (संप्रेरके) - त्यानंतर संप्रेरके सूक्ष्म प्रमाणात रक्तप्रवाहात सोडली जातात. हवे ते बदल घडवून आणण्यासाठी संप्रेरकांना आपापली टार्गेट सेल निश्चित करावी लागते.
संवेदी चेतातंतूंचे टोक (cell receptors ) - रिसेप्टर म्हणजे पेशींच्या पृष्ठभागावर किंवा आत असलेले विशिष्ट प्रथिन असते. हे प्रथिन रक्तप्रवाहातून वाहत येणाऱ्या विशिष्ट संप्रेरकाला ओळखून त्याच्याशी संलग्न होते.
संप्रेरक आणि रिसेप्टर संलग्न झाल्यावर पेशीमध्ये बरेचसे बदल घडून येतात. अश्याप्रकारे, अंतःस्रावी ग्रंथी अतिशय काळजीपूर्वकरीतीने नियंत्रित प्रमाणात हॉर्मोन्स रक्तप्रवाहात सोडून, एकाचवेळी लक्षावधी पेशींमार्फत शरीरात बदल घडवून आणतात.
उदाहरणार्थ , थायरॉईड ग्रंथींर्फत T3 आणि T4 हॉर्मोन्स स्रवले जातात. रक्तप्रवाहातून ते जवळपास सगळ्याच पेशींकडे पोहोचवले जातात. त्यांचा प्रभाव पेशींनी वापरलेली ऊर्जा आणि पेशींच्या कामाचा वेग यावर पडतो. त्यामुळेच श्वसनाचा वेग , शरीराचे तापमान , पचन इत्यादींवर त्याचा परिणाम होतो.
तारुण्यात पदार्पण करताना हॉर्मोन्सचा महत्त्वाचा वाटा असतो. पुरुषांमध्ये टेस्टिसमधून टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन मार्फत शरीरात बदल घडवून आणले जातात. जसे - आवाज बदलणे, उंची
वाढणे. स्त्रियांमध्ये ओव्हरी म्हणजेच अंडाशयामार्फत इस्ट्रोजेन हॉर्मोन स्रवला जातो. त्यामुळे मासिकपाळी तसेच गर्भधारणेसाठी शरीरात योग्य ते बदल घडवून आणले जातात.
स्त्री हॉर्मोन आणि पुरुष हॉर्मोन असं वेगवेगळं काही आहे का?
खरंतर स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन दोन्हीही हॉर्मोन्स असतात फक्त त्यांच प्रमाण वेगवेगळं असतं. या दोन्हीही हॉर्मोन्सचा गर्भधारणेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. तसेच इतर १० हॉर्मोन्स बाळाची वाढ आणि स्तनपान यात आईला मदत करतात.
हॉर्मोन्समधील बदल आणि मानसिकस्थितीमधील चढउतार यामध्ये जवळचा संबंध आहे. कारण मेंदूतील काही रसायनांच्या निर्मितीमध्ये जसे - सेरोटोनिन, हॉर्मोन्सचा प्रभाव पडतो. या रसायनाच्या पातळीतील चढ-उताराप्रमाणे आपल्या मानसिकस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. पण म्हणून हॉर्मोन्स आपल्यावर सत्ता गाजवतात असं मात्र नाही हं. विशेषतः पौगंडावस्थेत असताना हॉर्मोन्सचा आपल्या वागणुकीवर बऱ्यापैकी परिणाम होतो असं पाहिलं गेलं आहे खरं. पण संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की आपल्या एकंदर वागणुकीवर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव असतो. जसे - मेंदू आणि मेंदूतील विविध रसायनं, हॉर्मोन्स आणि सभोवतालची परिस्थिती.
अंतःस्रावी ग्रंथींचं प्राथमिक कार्य हे शरीरातील विविध कार्याचं नियंत्रण करणे आहे त्यावर ताबा ठेवणे नाही. काहीवेळा आजार, ताण-तणाव आणि आपला आहार सुद्धा या नियंत्रणामध्ये बाधा आणू शकतो. त्यामुळे हॉर्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होऊ शकतात किंवा विशिष्ट पेशींच्या कार्यपद्धतीत बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ - स्वादुपिंडातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हॉर्मोनच्या पातळीत घट झाल्यास होणारा मधुमेह हा एक सर्वपरिचित हॉर्मोन्सशी संबंधित आजार आहे. इन्सुलिन हॉर्मोन रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतो.
>
थायरॉईड ग्रंथीमधून पाझरणाऱ्या थायरॉईड हॉर्मोनच्या पातळीत चढ- उतार आल्यास हायपो किंवा हायपरथायरॉईडीझम होतो. थायरॉईड हॉर्मोनची पातळी कमी झाल्यास हृदयाचे ठोके मंदावणे, थकवा, नैराश्य इत्यादी लक्षणे दिसतात. तर थायरॉईड हॉर्मोनची पातळी वाढल्यास वजन कमी होणे, झोप न येणे, चिडचिड अशी लक्षणे दिसतात.
अश्याप्रकारे अंतःस्रावी संस्था आपल्या शरीराचा समतोल राखतात. आणि आपण जसे आहोत तसे असण्यामागे अंतःस्रावी ग्रंथीच्या नियंत्रणाचा खूप मोठा हात आहे बरं का !