Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

KEEP SOWING SEEDS

     I love gardening. It gives me happiness and satisfaction of being with nature. There is always magic in creation. Watching the tiny little plant blooming with fruits and flowers gives a tremendous joy. We all have experienced sowing seeds. If not by choice, at least for school project!

     Some seeds germinate very early. Some seeds take few days, few weeks. Some seeds take few months & when they germinate, they grow very fast. I remember, in childhood, it was a painstaking experience till that tiny leaflet comes out from soil. Then taking care of it till it becomes a plant!

     Now you will wonder why I am talking about gardening and plants, seeds instead of stress and illness..! I just wanted to correlate it with our thoughts. Yes..! Same thing happens with seeds of our thoughts- good or bad. Some thoughts or some good work gives immediate fruit. Some gives after some years may be. Some thoughts are sown in wrong soil so they don’t germinate. Like an expert gardener, with experience we understand where to sow which seed.

     For a plant basic requirement is - soil, sunshine & water; same way our heart must be a fertile land. If it is not, one must cultivate it. Second important thing is water which needs to be given daily. Water of good books, good deeds. Third important thing is sunshine=> spirituality. Some plants need fertilizers also. Fertilizers of updating and polishing our knowledge. Even after doing all this, some seeds may take years to grow.

      Because it needs other environmental conditions also like circumstances which are not in our control. My work is to keep sowing seeds of happiness, good thoughts. They will flourish when their time will come...after all if you are actively not cultivating something; you are actively destroying something – yourself, your relationships or your own peace of mind. As you think so you become...we heard this many times. So if you want to be happy, sow seeds of happiness. It’s that simple. In general, maintaining a sense of well-being in our everyday lives can relate to both the positive and negative activities in our daily routines.

      Happiness, whereas negative well-being tends to lead to depression and mental challenges. Mental health is one of today’s major health challenges, as approximately one in five individuals suffer from a mental health episode each year. Being emotionally well doesn’t necessarily mean that you’re happy all the time, but rather, that you’re self-aware and able to shift as a way to feel better. Being emotionally well leads to a happier and more blissful life, and also allows you the opportunity to attain your full potential. Happiness can improve your physical health; feelings of positivity and fulfilment seem to benefit cardiovascular health, the immune system, inflammation levels, and blood pressure, among other things. So friends keep Sowing Seeds of Happiness...!

पेरते व्हा

      मला बागकामाची खूप आवड आहे. त्यातून मला निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा आनंद आणि समाधान मिळतं. निर्मितीमध्ये नेहमीच एक जादू असते. इवल्याश्या रोपट्याचं झाड होऊन फळाफुलांनी डवरतं तेव्हा खूप आनंद होतो. आपल्याला सगळ्यांनाच झाड लावण्याचा अनुभव असतो. आवड जरी नसली तरी शाळेत असताना एखादं तरी झाड लावलेलं असतं, अगदी दिवाळीच्या किल्ल्यावर का होईना ..!

      काही बिया लगेचच रुजतात. काहींना बरेच दिवस लागतात, तर काहींना महिने लागतात. पण एकदा रुजल्या कि मात्र भराभर वाढतात. मला आठवतात लहानपणीचे ते दिवस, मातीतून डोकावणारा तो नाजूकसा अंकुर अन मग त्याच रोपटं होईपर्यंत घेतलेली काळजी...

      आता तुम्ही म्हणाल, आज मला काय झालंय ? ताण-तणाव आणि आजार सोडून मी ही काय बडबड चालवलीय ...तर मला याचा संबंध आपल्या विचारांशी जोडायचा आहे. खरंच...अगदी अस्संच आपल्या विचारांच्या बाबतीत होत असतं. काही वेळा चांगल्या विचारांचं किंवा कामाचं आपल्याला लगेचच फळ मिळतं. काही वेळा थोडं उशिरा कधी कधी तर काही वर्षांनी ! काही विचार चुकीच्या मातीत पेरले जातात, मग काहीच हाती लागत नाही. पुढे सरावानं एखाद्या अनुभवी माळ्यासारखं आपल्याला कळायला लागतं.. कधी आणि कुठे विचार पेरायचे.

      झाडांसाठी प्राथमिक गरजा असतात - माती , पाणी, सूर्यप्रकाश. त्याचप्रमाणे आपलं हृदय सुपीक जमिनीप्रमाणे आहे. नसेल तर त्याची चांगली मशागत करायला हवी. झाडाला जसं रोज पाणी द्यावं लागतं तसं मनालाही चांगली पुस्तकं आणि चांगल्या कामांची गरज असते. तिसरं महत्त्वाचं सूर्यप्रकाश म्हणजेच मनालाही अध्यात्माचा प्रकाश हवाच ...मार्गदर्शनासाठी ! झाडांना जशी खताची गरज असते तसंच आपल्यालाही आपल्या ज्ञानाला उजाळा देण्यासाठी अद्ययावत राहण्याची गरज असते. आणि एवढं सगळं करूनही काही बियांना रुजायला कित्येक वर्ष लागतात. कारण त्यासाठी बाह्य परिस्थितीदेखील गरजेची असते जी आपल्या नियंत्रणाबाहेर असते.

      आनंदाच्या, चांगल्या विचारांच्या बिया पेरत राहणं हे माझ्या हातात आहे. त्या रुजायच्या तेव्हा रुजतील. - जर तुम्ही सक्रियपणे काही जोपासत नसाल तर तुम्ही सक्रियपणे काहीतरी नष्ट करत असता; स्वतःला , नातेसंबंधांना किंवा तुमच्या मनःशांतीला. आपण बऱ्याचदा ऐकतो , जसा विचार कराल तसेच बनाल. मग सोप्पं आहे ...आनंदी राहायचं तर आनंदाच्या बिया पेरा.

     > सर्वसाधारणपणे आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या दिनचर्येतील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींशी आहे. सकारात्मक गोष्टीमुळे आनंद मिळेल तर नकारात्मक गोष्टीमुळे नैराश्य आणि भावनिक आव्हानं येतील. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही एक मोठी आरोग्य समस्या निर्माण झाली आहे.दरवर्षी ५ पैकी एका माणसाला एकदातरी मानसिक तक्रार जाणवते. भावनिकदृष्ट्या सक्षम असणं म्हणजे तुम्ही सदासर्वकाळ आनंदी असणं असं नाही तर तुम्ही स्वतःला ओळखणं आणि बरं वाटण्यासाठी स्वतःला बदलू शकणं असं आहे. भावनिकदृष्ट्या निरोगी असण्याने तुम्हाला तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून आनंदी आणि अधिक समाधानी आयुष्य जगात येते. आनंदी राहिल्याने तुमचे शारीरिक आरोग्यही सुधारते. सकारात्मकता आणि समाधान यांचा हृद्य तसेच प्रतिकारशक्तीवर चांगला परिणाम होतो. तर मग मित्र-मैत्रिणींनो आपण सगळेच आनंदाच्या बिया पेरत राहूया...