Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Effect of Stress on Skin

     A blush, Goosebumps, crawling sensation on skin are some of the examples that prove that there is connection between emotional state and our skin. So whether its war, divorce, losing your job or any stressful situation, this often shows up on our skin first. But we so often dismiss that unimportant and superficial. Do you know? Touch is the first sensation that we learn in the womb! Recent research has confirmed skin both as an immediate stress perceiver and as a target of stress responses. As the largest organ of the body, skin plays important barrier and immune functions, maintaining homeostasis between external environment and internal tissues.

     We have already discussed how stress causes secretion of stress hormones. These stress hormones can upset your skin in multiple ways. One of them leads to inflammatory changes, which in turn causes your skin to freak out.

      If your genetics, environment, or both make you susceptible to certain skin-related ailments, this inflammation can also make them flare up. But it can also just make your skin hypersensitive. Specifically in skin, multiple neuroinflammatory conditions can be triggered or aggravated by stress, such as: Psoriasis, Atopic Dermatitis, Acne, Contact Dermatitis, Alopecia Areata, itch or Pruritus and Erythema.

     This doesn’t mean stress will cause these conditions if you don’t have them. Even if you don’t have an actual skin condition, dealing with way more stress than usual for a significant amount of time might make your immune system hyperirritable, so something that doesn’t normally bother your skin can make it freak out. Some of the skin conditions caused due to stress are under eye bags, dry-flaky skin, blemishes, acne, thinning of hair, rashes, greying of hair and hairfall.

      The real message to take away from this is that, there are lots of ways; stress and your skin can affect each other. Managing your stress will keep you away from skin affections or minimise the severity of complaints but it’s not the end. In addition to taking your breakouts and flare-ups as a sign that you need to chill and take time for self-care, talk to a professional if symptoms persist.

      In Classical Homeopathy, external applications are prohibited for skin complaints. Consider if a house is burning, by shutting the windows you will not see the fire but it will spread all over. Same way if we treat skin with only external applications, the real cause will remain untapped thus giving you temporary relief. By external applications you are suppressing the disease; anything which is suppressed comes out with more resistance. Same way you get aggravations and relapses in your complaints. Classical Homeopathy strongly believes on mind–body connection therefore treatment is done with oral medicines only. The cure starts from within outwards. Thus, giving you permanent relief from the complaints.

ताण-तणाव आणि आपली त्वचा

      आश्चर्याने रोमांचित झालेलं अंग ,अंगावर येणारा शहारा किंवा लाजेनं आलेली लाली ही, त्वचा आणि भावना यांचा परस्परसंबंध असल्याची उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळेच युद्ध, घटस्फोट ,नोकरी गमावणे किंवा इतर काही तणावपूर्ण गोष्टींचा पहिला परिणाम तुमच्या त्वचेवर लगेचच दिसून येतो. पण बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला माहित आहे का? गर्भावस्थेत असताना आपण सर्वप्रथम शिकतो ते स्पर्शज्ञान ! नवीन संशोधनात असं आढळून आलं आहे की ताण-तणावाची पहिली जाणीव त्वचेत होते तसेच ताण- तणावाचा पहिला परिणामही त्वचेवरच दिसून येतो. शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणून त्वचा प्रतिबंध तसेच प्रतिकार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडून बाह्यपरस्थिती व अंतः परिस्थिती मध्ये समतोल राखते.'मुविंग फॉरवर्ड' म्हणजे नक्की काय बरं? मी क्लासिकल होमीओपॅथ असल्यामुळे माझे पेशंट माझ्याबरोबर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी खूप बोलतात. असे बरेच पेशंट्स भेटतात ज्यांनी आयुष्यात खूप मोठे ताण, अपमान, भरून न येणारे नुकसान किंवा सांत्वन करण्या पलीकडचे दुःख सहन केलेलं असतं. काही लोक त्या घटनेतून बाहेर येऊच शकत नाहीत तर काही लोक मात्र त्या घटनेनंतर आमूलाग्र बदललेले असतात.

      ताण-तणावाचा स्ट्रेस हॉर्मोन्स वर होणारा परिणाम आपण याआधी पहिला आहे. स्ट्रेस हॉर्मोन्सचा तुमच्या त्वचेवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्वचेचा दाह (जळजळ) होणे त्यापैकीच एक. अनुवंशिकता , बाह्यपरिस्थिती किंवा दोन्हीच्या एकत्रित परिणामाने काही त्वचारोग होऊ शकतात. त्वचेचा दाह अश्या त्वचारोगात खतपाणी घालतो. किंवा तुमच्या त्वचेला अतिसंवेदनशील बनवू शकतो. सोरायसिस , इसब,तारुण्यपिटिका , चाई, सूज, खाज, ऍलर्जी अश्या त्वचा रोगांना ताण-तणावामुळे चेतना मिळते किंवा त्यांची तीव्रता वाढते. याचा अर्थ असा अजिबात नाही कि ताण-तणावांमुळे तुम्हाला वरील त्वचारोग होतील. पण बऱ्याच काळापर्यंत जर तुम्ही तणावयुक्त परिस्थितीला सामोरे जात असाल तर त्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊन तुमची त्वचा अतिसंवेदनशील होऊ शकते. त्यामुळेच आधी ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत नव्हता त्या गोष्टींमुळे तुमच्या त्वचेचा दाह होऊ शकतो. ताण-तणावाचे त्वचेवर होणारे परिणाम म्हणजे डोळ्याखाली येणारी सूज, कोरडी- रुक्ष त्वचा, डाग (uneven skin tone), पुरळ, केस गळणे, पातळ होणे,अकाली पांढरे होणे.

      या सगळ्या लेखनप्रपंचाचा मूळ मुद्दा हा कि ताण-तणाव आणि त्वचा एकमेकांवर वेगवेगळ्याप्रकारे प्रभाव पाडत असतात. तुमच्या ताण-तणावाचं योग्य नियोजन करून तुम्ही स्वतःला त्वचारोगांपासून दूर ठेवू शकता किंवा त्यांची तीव्रता कमी करू शकता. पण इथेच न थांबता, रुक्ष कोरडी त्वचा किंवा दाह म्हणजे धोक्याची पूर्वसूचना असे समजून स्वतःवरचा ताण कमी करा आणि स्वतःची योग्य काळजी घ्या. आणि तरीही लक्षणांत फरक न पडल्यास गरज असेल तेव्हा तज्ञांची मदत घेण्यास लाजू नका.

      क्लासिकल होमिओपॅथीमध्ये, त्वचारोगासाठी केवळ बाहेरून लावण्याच्या औषधांना सक्त मनाई आहे. समजा घराला आग लागली आहे , तर दार-खिडक्या बंद केल्या म्हणजे आपल्याला आग दिसणार नाही पण ती सगळीकडे पसरेल. अगदी तस्संच , त्वचारोगांमध्ये फक्त बाहेरून लावण्याची औषधे वापरली तर आजाराचे मूळ कारण तसेच राहील आणि तुम्हाला तात्पुरता फरक वाटेल. फक्त बाहेरून लावण्याची औषधे वापरून तुम्ही रोगाला दाबता. जी गोष्ट दाबली जाते ती उसळून बाहेर येते. त्यामुळे एकतर तुमचा आजार बळावतो किंवा पुनःपुन्हा होत राहतो. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधावर खूप भर दिला जातो. त्यामुळे त्वचारोगासाठीदेखील तोंडावाटेच औषधे दिली जातात. बरे होण्याची प्रक्रिया आतून सुरु होते आणि रोगाचे समूळ उच्चाटन होते.

      नुरोसायन्सप्रमाणे , अश्या सततच्या निराशावादी बोलण्यामुळे मेंदूतील नुरॉनच्या वायरिंग मध्ये बदल होतो. behaviour सायन्स सांगत कि यामुळे तुमच्या वागणुकीवर विपरीत परिणाम होतो. bio-chemically तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स स्रवले जातात. याचा परिणाम म्हणजे विविध शरीर संथांच्या कार्यात बिघाड , तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी. आता या सगळ्याचा ' त्या समस्येशी' काहीही संबंध उरत नाही. प्रश्न उरतो तो कोण दुःख उगाळत बसलं? आणि कोण दुःखाला मागे सारून पुढे आलं ?