Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Effect of Stress on Digestive System

     When a person becomes stressed enough to trigger the fight-or-flight response, (please refer article – effect of stress on you) body releases stress hormone cortisol to make body alert and prepared to face the threat. The resulting chemical imbalance can cause a number of gastrointestinal conditions. It can slow down the digestion or even stops it so that the body can divert all its internal energy to facing a perceived threat. Of course, it can work the other way as well; persistent gastrointestinal problems can heightened anxiety and stress. Other factors, such as genetics, early life experiences, cognitive factors, and environmental support also play important role in development of stress induced pathological conditions.

     Common stress-related gut symptoms and conditions include:

  • indigestion
  • stomach cramps
  • diarrhoea
  • constipation
  • loss of appetite
  • unnatural hunger
  • nausea

     Although stress may not cause stomach ulcers or inflammatory bowel disease, it can make these and other diseases of digestion worse, so it’s important to take measures to be in control during stressful situations and find ways to keep you calm.

      Once you suffer with one of these conditions, the condition itself can become a source of anxiety and greatly impact your quality of life. For example, if you experience stomach cramps or indigestion, you might become fearful of these symptoms causing you to limit where and what you eat which could impact your social life.

      Many stomach disorders cannot be resolved with only oral medicines. You must address the stress reduction also. In Classical Homeopathy we consider the person’s physical complaints as well as emotional nature. This way selected Homoeopathic medicine helps to reduce the anxiety as well as physical complaints. At Atharv Clinic we take Art therapy Session to deal with stress. So the combination of medicine and therapy, focusing on the root cause i.e. stress, gives total relief from symptoms.

ताण-तणावांचा पचनसंस्थेवर होणार परिणाम

      परीक्षेच्या दिवसात पोट बिघडणं किंवा महत्त्वाच्या प्रेझेंटेशनआधी पोटात गोळा येणं, असं तुम्ही कधी अनुभवलं आहे का..? मग असं कुणी तुम्हाला माहित आहे का ज्यांना महत्त्वाच्या मीटिंगआधी वॉशरूमला जाऊन यावं लागतं..? आम्ही याला 'नर्वस डायरिया' असं म्हणतो. कमी ताणाच्या स्थितीत जसे की - सभेत बोलणे , पचन क्रियांचा वेग मंदावतो किंवा त्यात अडथळा येतो. त्यामुळे पोटात गोळा येणे, गुडुगुडू होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

      ताण वाढल्यास fight -or -flight mechanism सुरु होऊन स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल शरीरात स्रवला जातो. त्यामुळे समोरील परिस्थितीला हाताळण्यासाठी शरीर दक्ष होते. याचा परिणाम म्हणून तुमच्या पचनक्रिया मंदावू शकतात किंवा थांबूही शकतात, जेणेकरून समोर आलेल्या समस्येकडे शरीराला अधिक लक्ष केंद्रित करता येते. असे बऱ्याचदा पोट बिघडत राहिल्यास, पोट बिघडेल अशी सतत भीती वाटून ताण वाढू शकतो. मग हे एक चक्रच बनून जाते. इतर गोष्टी जसे - अनुवंशिकता, पूर्वायुष्यातील ताण - तणाव, खाण्या-पिण्याच्या सवयी

अतिताणामुळे होणारे आजार -:
  1. - अपचन
  2. - पोटात गोळा येणे.
  3. - जुलाब
  4. - बद्धकोष्ठता
  5. - भूक न लागणे
  6. - अतिभूक
  7. - मळमळ

      Irritable Bowel Syndrome (IBS) आणि peptic ulcer हे आजार स्ट्रेसमुळे होत नाहीत पण बळावतात मात्र. तसेच पोटाचे इतर आजारही स्ट्रेसमुळे बळावतात. त्यामुळे ताण-तणावाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.एकदा का तुम्हाला वरीलपैकी कोणताही आजार झाला कि त्या आजाराचाच तुम्हाला इतका ताण येतो कि त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ - समजा तुम्हाला अपचन किंवा जुलाबाचा त्रास आहे. तर बाहेर जाताना तुम्हाला सतत ताण राहतो कि आता मी काय खाऊ किंवा कुठे खाऊ. याचा तुमच्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो.

      पोटाचे बरेच आजार फक्त औषधांनी बरे होत नाहीत. तुमच्या ताण-तणावांचेही योग्य नियोजन करावे लागते. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये आम्ही रुग्णाची शारीरिक तसेच मानसिक लक्षणे पाहून औषध योजना करतो. तसेच अथर्व क्लिनिक मध्ये आम्ही आर्ट बेस्ड थेरपीचे सेशन घेऊन ताण-तणावांचेही नियोजन करतो. अश्याप्रकारे आजाराचे समूळ उच्चाटन केले जाते.