Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

The Beginning...

      ‘In every end there is also a beginning’ Today is last day of 2019...from tomorrow we will have New Year 2020...new beginning..! Therefore, we have the opportunity to start again. We must let go of what is gone, to allow in our life what is waiting for us. Life is always changing, and that is what makes this life to be so beautiful and exciting

      Few years back I used to wait for New Year so as to start something new.With passing years, I understood there is no need to have a New Year day to begin something new..! If I introspect myself, there was partly reluctance to leave my comfort zone; partly laziness, procrastinations - all this ultimately would gulp my inner voice – my true guide..! Actually there is nothing like New Year day... You can anytime start and let that become New Year day of your life as you have started something new..! It will definitely crave and carve a newer version of YOU...!

      Beginnings are beautiful. If you look at each day as new beginning, you will feel happier, more energetic and more motivated. The first day of exercise / diet, the start of a new job, or decision of quitting a bad habit - they can be different from what we are used to, and it can be hard to adapt, but there’s just something so liberating, so freeing, and so beautiful about new beginnings.

      The question is whether you carry through what you decided and promised. It is simple and easy to make NEW YEAR RESOLUTION or any other decision at any other time of the year. Often we are doing it under emotional influence- everybody is doing so I must. However, people quite soon, loose the motivation and enthusiasm, and continue living the same kind of life, without doing anything to improve them. If you failed to carry them out, you don’t need to wait for the beginning of the NEW YEAR. You can start again every day, if you failed in your first, second or even third attempt. Consider your mind as a spoiled brat; let it be adamant. This is why you need to make resolutions and repeat them every day. It is not enough to state them just once, when the NEW YEAR begins.

      First remember the feeling you are “starting with nothing” is simply not true. When we start something new... we can always start with confidence, motivation, will, hard work, perseverance, knowledge, understanding, personality, experience, research...All these things matter the most..!

      You are not starting with nothing in this New Year. You are starting with YOU- the very most important thing you could have, and all you need to begin. So friends,

      pStart where you are.

     Use what you have.

     Do what you can.

     Life is a journey, full of twists and turns, bumpy roads and newly paved streets. We can never be fully prepared for what lies ahead. But if you want to go on this new path, don’t let the roadblocks stop you from fulfilling your hopes and dreams.

           HAPPY NEW YEAR!

प्रारंभ

      प्रत्येक शेवटामध्ये एक आरंभ लपलेला असतो. नवीन वर्ष २०२० सुरु झालंय. त्यामुळे शुभारंभासाठी आपल्याकडे एक नवी संधी आहे. नवीन गोष्टींना आपल्या आयुष्यात जागा देण्यासाठी, आपण झालं गेलं सारं विसरून जाऊया. आयुष्य खूप सुंदर आणि रोमांचक आहे कारण ते सतत बदलत असतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची खूप वाट पहायचे. कारण मला वाटायचं, नवीन काही सुरु करण्यासाठी हाच उत्तम दिवस ! पण वाढत्या वयानुसार समजायला लागलं की असं काही नसतं.

     अंतर्मुख होऊन विचार केला तर जाणवतं, यामागे माझा आळशीपणा,चालढकल आणि सवयी बदलण्यासाठी मनापासून तयारीच नसायची. आणि अशामुळे माझा खरा मार्गदर्शक - माझा आतला आवाज मात्र दडपला जायचा. खरंतर नवीन वर्षाचा नवीन दिवस असं काही नसतं. म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही काही नवीन करायला सुरु करता. तेव्हा त्यासाठी झटताना तुमच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू तुमच्या समोर यायला लागतात. तुमचं एक नवीनच रूप समोर येऊ लागतं. म्हणजेच कधीही सुरुवात केलीत तरी तो दिवस तुमच्यासाठी तुमच्या नवीन आयुष्याचा पहिला दिवस असतोच की..!

      सुरुवात नेहमीच सुंदर असते. म्हणूनच जर प्रत्येक दिवसाकडे तुम्ही नवीन सुरुवात म्हणून पाहिलं तर तुम्ही नेहमीच आनंदी, उत्साही आणि प्रेरित राहू शकता..! पहिला दिवस मग तो व्यायामाचा असो किंवा डाएटचा , नव्या नोकरीचा असो किंवा एखादी जुनी हट्टी सवय सोडण्याचा - हा दिवस वेगळा असतो कारण आपण बदलत असतो. मनाला मुरड घालणं थोडं कठीण असतं पण त्यातही मुक्तीचा, नव्या सुरुवातीचा स्वतंत्र असा एक वेगळाच आनंद लपलेला असतो.

      आता ठरवल्याप्रमाणे तुम्ही वागताय की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला एखादा निग्रह करणं किंवा वर्षातल्या कुठल्याही दिवशी एखादा निर्णय घेणं खूप सोप्प आहे. बऱ्याचदा आपण असं भावनेच्या भरात करून बसतो - सगळे करताहेत मग मीही करायला हवं. पण मग लोक खूप लवकरच आपला उत्साह आणि उमेद हरून बसतात. आणि स्वतःला बदलण्याचे काहीही प्रयत्न न करता, आधीसारखच आयुष्य जगत राहतात. जर तुमचा निग्रह पाळण्यात तुम्ही अपयशी झालात तर परत नव्या वर्षाची वाट पाहायची गरज नाही. पहिल्यांदा , दुसऱ्यांदा अगदी तिसऱ्यांदा जरी अपयशी झालात तरी दररोज तुम्ही नवी सुरुवात करू शकता. असं समजा की तुमचं मन हे एखाद्या व्रात्य मुलासारखं आहे. मग ते हट्टीपणा करतच राहणार..! म्हणूनच आपण रोजच निग्रह करायला हवा. फक्त नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ठरवून उपयोग नाही.

      पहिली गोष्ट म्हणजे, नवीन काही सुरु करायचं तर 'माझ्याकडे काहीच नाही' जसे - पैसा, वेळ,आरोग्य, भागीदार... हा समज मनातून काढून टाका. जेव्हा आपण काही नवीन ठरवतो तेव्हा आपण आत्मविश्वास , प्रेरणा, इच्छाशक्ती, परिश्रम, चिकाटी, जिद्द , ज्ञान, अनुभव, व्यक्तिमत्त्व, चिकित्सा या गोष्टींच्या जोरावर सुरुवात करू शकतो.