Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Happy Diwali...Happy journey..!

      Diwali – the festival of lights. Diwali means preparations, cleaning, yummy snacks and sweets, get-togethers, family, friends, new beginnings. During our childhood, we had fascination for Diwali - Diwali snacks, new clothes, firecrackers, making clay fort and 21 days vacation! Now days no one gets this much vacation and rest all things have become a routine. So then how to celebrate Diwali..? We can illuminate our inner light and help others in that. We can beat our own limitations in every aspect of life. It is said, you realise what burden you are carrying when you unload it. It gives tremendous joy, lightness & freedom. It cannot be told, it has to be experienced. It’s like decluttering your mind, making it cleaner & clearer than before. Do you ever realise, when you clean your home or set your cupboard, rearrange your desk. Suddenly you start feeling happy & positive. A bit of confidence also improves. Your mood becomes assertive. You also realise what all things you have..!;

      This Diwali let’s declutter our mind. First of all leave the concept of ‘everything will settle down after...’ the whole concept of ‘settling down’ is misleading. We think we will settle down after finishing our studies (seriously) may be marriage (nope) then we think we might settle down after being successful (doesn’t happen) certainly after having kids(do we!) ok after the kids grow up (absolutely not). Life is not, meant to settle down, life is meant to struggle, to explore, to wonder, to love, to loose, to learn, to unlearn, to fail, to rebel that’s all is life..! Even our ashes don’t settle, it flies away in all direction.

      No one is going to love you exactly like you imagine. No one is ever going to read your mind & take every star from the sky at the perfect time & hand it to you. That’s why you have to love yourself. . Don’t wait for someone who will praise you. Start loving yourself. This world will start loving you... Always keep your keys with yourself...your keys of Happiness!

      Do something where you feel connected, so one does it happily, in dedicated manner. When we undertake some task, things need not go smoothly rather one bound to get obstacles. So while travelling towards our goal, keep it in mind; there will be twist & turns. We must cultivate attitude to enjoy them. Taking a pause, if necessary & move again.

Our struggles will become a beautiful journey! Happy Journey Guys...

Happy Diwali!

शुभ दीपावली! हैप्पी जर्नी !

      दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग...दिवाळी म्हणजे तयारी, साफ-सफाई , फराळ , मिठाई, एकत्र येणं, नातेवाईक , मित्र-मैत्रिणी , नवी सुरुवात ! लहानपणी आम्ही दिवाळीची उत्सुकतेने वाट पाहायचो - दिवाळीचा फराळ, नवे कपडे, फटाके, मातीचे किल्ले बनवणं आणि एकवीस दिवसांची सुट्टी..! हल्ली एवढी सुट्टी दिवाळीत मिळत नाही आणि बाकीच्या गोष्टी तर रोजच्याच झाल्यात. मग दिवाळी कशी बरं साजरी करायची..?

     आपण आतून उजळूया आणि इतरांना उजळायला मदत करूया. आपण आपल्याच मर्यादांवर विजय मिळवू शकतो. काही गोष्टींचा आपल्यावर किती ताण आहे हे तो ताण उतरल्यावरच जाणवतं. त्यानंतर जाणवणारा आनंद , मोकळेपणा,हलकेपणा हा शब्दात सांगता येणार नाही, तो अनुभवण्याची गोष्ट आहे. हे म्हणजे मनातला पसारा आवरून मन पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं घर साफ करता, कपाट लावता किंवा टेबल आवरता त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं..?खूप छान वाटतं. वागण्याबोलण्यात सकारात्मता येते. थोडा आत्मविश्वासही वाढतो. कधी जाणवलंय का असं तुम्हाला..?

      या दिवाळीत मनातला पसारा आवरूया. सगळ्यांत पहिले 'मग सगळं छान होईल...' ही संकल्पना मोडीत काढू या. 'असं झाल्यानंतर ..' ही संकल्पनाच दिशाभूल करणारी आहे. आपल्याला वाटतं शिक्षण झाल्यावर सगळं छान होईल .... लग्नानंतर ... मग आपल्याला वाटतं कि आपण यशस्वी झाल्यावर सगळं काही छान होईल ( असं होत नाही ) मुलं झाल्यावर (असं काही असतं का ) ठीक आहे ..मुलं मोठी झाल्यावर (अजिबात नाही ) मुळात आयुष्य म्हणजे सगळं काही छान छान असं काही नसतं. आयुष्य म्हणजे झगडणं, उलगडणे, चकित होणं , प्रेम, हार - जीत, यश, अपयश, सोडून देणं, शिकणं, विसरणं, बंडखोरी या सगळ्याचा परिपाक..! इतकंच काय आपली राखसुद्धा एका जागी स्थिर रहात नाही, तीदेखील सर्वत्र उडते. कुणीच तुमच्यावर, तुम्हाला हवं तसं प्रेम करणार नाही. कुणालाच तुमचं मन पूर्णपणे वाचता येणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्हीच स्वतःवर प्रेम करायला हवं. दुसऱ्या कुणी तुमची प्रशंसा करण्याची वाट बघण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला शाबासकी द्या ना. स्वतःवर प्रेम करा . जग ही तुमच्यावर प्रेम करेल.

तुमच्या आनंदाच्या चाव्या तुम्ही तुमच्या जवळच ठेवा ना.

      तुमच्या आवडीचं असं काही करा, मग तुम्ही ते आनंदाने आणि झोकून देऊन कराल. आपण काही कार्य हाती घेतो तेव्हा सगळं काही ठरवल्याप्रमाणेच होणार असं नसतं , अडथळे येणारच. आपल्या धेय्याकडे जाणारा रस्ता वळणावळणाचा असणार हे मनात पक्क असायला हवं. त्याचा आनंद घेण्याची सवय आपण लावायला हवी. गरज पडली तर थोडी विश्रांती घ्यायची पण पुढे चालत राहायचं. दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. प्रत्येकानेच सुट्टीत फिरायला जाण्याचे बेत आखले असणार. सुट्टीचे बेत आखण्यातही एक वेगळीच गम्मत असते. खरं तर मनात प्रवासाला तेव्हाच सुरुवात झालेली असते. घाटातल्या रस्त्यातून जाताना , तिथल्या वळणा-वळणांची आपण मजा घेतो. दरीतील सोंदर्य आपण न्याहाळतो . आपण थांबून फोटो काढतो. कधी कधी मळमळ वाटली तरी आपण मागे फिरत नाही. कारण घाटमाथ्यावरच्या सौन्दर्याची आपल्याला ओढ असते. अगदी अशीच मनस्थिती धेय्याप्रती वाटचाल करताना ठेवली तर आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. मनात कुठली सल राहणार नाही कि कुठला किंतु ...राहील तो फक्त आनंद. मग आपला संघर्ष एक सुंदर प्रवास बनून जाईल. हैप्पी जर्नी ...

शुभ दीपावली