Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Irritable bowel syndrome

      Doctor, what is happening with me? I get pain in abdomen suddenly I get loose stool. Sometimes I suffer with constipation. I follow strict diet. I don’t eat outside, still this happens with me. Sometimes there is only tightness or pain in the stomach. Its unpredictable. The 25 yrs. boy sitting in front of me was frustrated, exhausted with his complaints. He was suffering from Irritable bowel syndrome. What is Irritable bowel syndrome? Irritable bowel syndrome (IBS) is a group of symptoms that occur together, including repeated pain in your abdomen and changes in your bowel movements, which may be diarrhea, constipation or both. IBS is a group of intestinal symptoms that typically occur together. The symptoms vary in severity and duration from person to person. However, they last at least three months for at least three days per month.

Risk factors

      · IBS occurs more frequently in people under age 50. · IBS is more common among women. · Family history of IBS. · Anxiety, depression and other mental health issues are associated with IBS. A history of sexual, physical or emotional abuse also might be a risk factor.

      The symptoms of IBS typically include: · cramping · abdominal pain · bloating and gas · constipation · diarrhoea Weight loss - Cramping may come more often right after you eat. If frequent diarrhoea is one of your symptoms, your body may not be getting all of the nutrients from the food you eat. Your weight may decrease as a result of this.. The exact cause of IBS is unknown. It is a functional Gastro-intestinal disorders. It can result after severe bacterial infection. Possible causes include an overly sensitive colon or immune system. This can cause your gut to be more sensitive and change how the muscles in your bowel contract.

Triggers

      Certain foods as well as stress and anxiety can be triggers for IBS symptoms for many people. Effect of stress - Stress can affect your nerves, making your digestive system overactive. If you have IBS, your colon may be overly responsive to even slight disruption of your digestive system. IBS is a chronic disease. It is also seen that it is difficult to cure as there are varied causative factors. it all in” will eventually reach an emotional breaking point. If one of your body systems is weakened, this is where a stress-related illness is most likely to develop. If your weakest point physically is your head, you’ll develop headache or backache or Urticaria or frequent colds and flu.

Homoeopathic management of IBS

      Classical Homeopathy focuses to tap the root cause so it is an effective treatment for IBS. As the causative factor is stress, anxiety; often it is seen, IBS require long term treatment.

इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम

      डॉक्टर, नक्की काय झालाय मला? कधी माझ्या पोटात दुखतं तर कधी मला जुलाब होतात. कधी माझी पोट साफ होत नाही. मी माझ्या आहाराची नीट काळजी घेतो. मी बाहेरच खात नाही. तरीपण मला का हा त्रास होतो? कधी कधी तर माझं फक्त पोट कडक असत. कधी कुठला त्रास होईल काही सांगता येत नाही. माझ्या समोर बसलेला २५ वर्षाचा तो मुलगा अगदी अगतिक होऊन सांगत होता. त्याला इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम झाला होता. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम म्हणजे नक्की काय? इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम हा एक एकत्रितपणे दिसून येणारा लक्षण समुच्चय आहे- पोट दुखी, जुलाब किंवा मलावरोध किंवा दोन्हीही. लक्षणांची तीव्रता आणि कालावधी जरी प्रत्येक रुग्णात वेगवेगळा असला तरी सर्वसाधारणपणे ही लक्षणे ३ महिने किंवा दर महिन्यातील ३ दिवस दिसून येतात.

जोखीम

      - ५० वर्षापेक्षा कमी वय - स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. - अनुवंशिकता - चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक आजार किंवा शारीरिक/मानसिक/लैंगिक छळ झालेल्या लोकांमध्ये IBS चे प्रमाण अधिक दिसून येते.मनोकायिक आजारासाठी बरीच कारणं असू शकतात. जसे- स्वभावविशेष, अनुवंशिकता किंवा परिस्थितीजन्य कारणे, संगोपन, अवलोकन वगैरे. मनोकायिक आजारांमुळे येणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक मर्यादांचा एखाद्याच्या आयुष्यावर कमी वा जास्त प्रभाव पडू शकतो. मानसिक आजारांचा उगम भावनिक ताण किंवा हानिकारक विचारांपासून होऊन प्रकटीकरण मात्र शारीरिक लक्षणात होतं. अश्या केसेसमध्ये बऱ्याचदा अतीव ताणामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती खालावलेली असते.

लक्षणे

      - पोटात पेटके येणे. - पोट दुखणे - पोट फुगणे , गॅसेस - मलावरोध - जुलाब - वजन कमी होणे- जेवणानंतर लगेच पोटात कळा येतात. आणि जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर तुम्हाला आवश्यक पोषकतत्वांची कमतरता निर्माण होऊन वजनात घट होऊ शकते. इर्रिटेबल बॉवेल सिन्ड्रोम नक्की कशामुळे होतो हे अजून लक्षात आलेले नाही. पण कधी कधी जिवाणूंच्या तीव्र संसर्गामुळे याची सुरुवात होते असं दिसून आले आहे. आणि एक शक्यता अशी की तुमची रोगप्रतिकार प्रणाली आणि तुमचे मोठे आतडे अतिशय संवेदनशील असणे. याचा तुमचे पोटाचे स्नायू आकुंचन पावण्याच्या क्रियेवर परिणाम होतो.

      कारणे-: १. काही अन्नपदार्थ, ताण-तणाव तसेच चिंता यामुळे देखील IBS ची लक्षणे दिसून येतात. २. ताण - तणावाचा परिणाम – तणावामुळे तुमच्या पोटाच्या नसा संवेदनशील होऊ शकतात. आणि थोड्याश्या बदलांना तीव्र प्रतिसाद देऊ शकतात. IBS हा एक जुनाट आजार आहे. आणि हा बरं व्हायला देखील बराच काळ लागतो. कारण IBS होण्याची विविध कारणे आहेत.

होमीयोपॅथीक उपचार -

      क्लासिकल होमियोपॅथीमध्ये रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय केले जातात. त्यामुळे IBS साठी होमीयोपॅथीक उपचार प्रभावी ठरतात. बऱ्याचदा तणाव आणि चिंता ही प्रामुख्याने दिसून येणारी कारणे असल्यामुळे दीर्घकाळपर्यंत उपचार करावे लागतात.