Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Constipation

      Do you remember the movie PIKU, the whole movie revolves around Piku’s father’s constipation! See, problem of constipation is so common that one decided to make a movie on it! Often, we heard people saying, my motions are not regular. I am not feeling hungry. There is fullness in my abdomen. This is because they are having constipation. What is constipation? Constipation is one of the most common digestive problems. It’s defined as having hard, dry bowel movements, or going fewer than three times a week. Colon absorbs water from the residual food while passing through it. The colon’s muscles eventually propel the waste out through the rectum to be eliminated. If stool remains in the colon too long, it can become hard and difficult to pass.

What causes Constipation?

      So, you can understand; type of food, water intake and physical activity plays important role in preventing constipation. Dietary fibre and adequate water intake are necessary to help keep stools soft. People with a high intake of dietary fibre are less likely to experience constipation. Because fibre promotes regular bowel movements, especially when a person combines it with proper hydration. High fibre foods include: fruits, vegetables, whole grains, nuts, lentils, chickpeas, and other legumes. Low fibre foods include: high fat foods, such as cheese, meat, and eggs. highly processed foods, such as white bread. fast foods, chips, and other premade foods. Low levels of physical activity may also lead to constipation. People who spend several days or weeks in bed or sitting in a chair may have a higher risk of constipation.

How do you know that you have constipation?

      Each person’s definition of normal bowel movements may be different. Some individuals go three times a day, while others go three times a week. You may be constipated if you experience the following symptoms: · fewer than three bowel movements a week · passing hard, dry stools · straining or pain during bowel movements · a feeling of fullness, even after having a bowel movement · experiencing a rectal blockag

बद्धकोष्टता

      तुम्हाला 'पिकू' चित्रपट आठवतो का ? हा संपूर्ण चित्रपट पिकूच्या वडलांच्या बद्धकोष्ठतेभोवती फिरत रहातो. बघा ना.. एखाद्याला चित्रपट बनवावासा वाटेल इतपत हा त्रास सगळ्यांच्या ओळखीचा आहे ! लोकांकडून बऱ्याचदा आपण ऐकतो, माझं पोट साफ होत नाही. मला भूक लागत नाही. पोट फुगल्यासारखं वाटतं. हे सगळं बध्धकोष्टतेमुळे होत असतं. बध्ध्दकोष्टता (मलावरोध) म्हणजे नक्की काय? मलावरोध हा पचनसंस्थेचा साधारण आजार आहे. मलावरोध म्हणजे आठवड्यातून तीन पेक्षा कमी वेळा किंवा कठीण आणि शुष्क मल तयार होणे.

मलावरोध कशामुळे होतो?

      आतड्यामध्ये अन्नातील पाणी शोषले जाते. आणि मल पुढे गुदाशयाकडे सरकवला जातो. त्यामुळे आतड्यामध्ये मल दीर्घकाळपर्यंत राहिल्यास तो कठीण आणि शुष्क होतो आणि पुढे सरकवणे मंदावते. त्यामुळेच, अन्नाचा प्रकार, शरीरातील पाण्याचे प्रमाण, शारीरिक श्रम या सगळ्याचा मलावरोध टाळण्यासाठी उपयोग होतो. मल मऊ राहण्यासाठी अन्नातील तंतुमय पदार्थ आणि पुरेश्या पाण्याची गरज असते. त्यामुळे जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि पुरेसे पाणी पिणाऱ्या लोकांना मलावरोध होत नाही. तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ - फळे, भाज्या,धान्ये, शेंगदाणे,शेंगवर्गीय भाज्या, चणे,मसूर ई तंतुमय घटकांचे प्रमाण कमी असलेले अन्नपदार्थ - चरबीयुक्त पदार्थ जसे- चीझ, मांस, अंडी. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे - पाव, वेफर्स , फास्ट फूड . इतर तयार अन्नपदार्थ . अतिशय कमी शारीरिक हालचाली असल्यास देखील मलावरोध होऊ शकतो. जसे - अंथरुणाला खिळलेले रुग्ण, बैठे काम करणाऱ्या व्यक्ती यांनाही मलावरोध होण्याची जास्त शक्यता असते.

इतर कारणे-

      · शौचाची भावना दाबणे. · प्रवास किंवा दिनक्रमात बदल · काही औषधे · गरोदरपण · काही आजार जसे हायपोथायरॉईडीसम · अतिप्रमाणात किंवा चुकीच्या प्रमाणात पोट साफ होण्याची औषधे घेणे. ताण- तणाव, काही आजार- ज्यामध्ये आतड्याची हालचाल मंदावते. यामुळे देखील बध्ध्दकोष्टता होते.

तुम्हाला मलावरोध झाला आहे हे कशावरून ओळखायचे?

      प्रत्येक माणसाचे 'पोट साफ होणे' हे वेगळे असू शकते. कारण काही माणसांचे दिवसातून ३ वेळा पोट साफ होऊ शकते. तर काही माणसांचे आठवड्यातून ३ वेळा पोट साफ होऊ शकते. तरीही खालील लक्षणे दिसल्यास तुम्हाला मलावरोध असू शकतो. § आठवड्यात ३ पेक्षा कमी वेळा पोट साफ होणे. § कठीण आणि शुष्क मल § शौचवेळेस जोर करावा लागणे व दुखणे. § शौचानंरही पोट जड वाटणे. § गुदाशय गच्चं वाटणे.

होमीयोपॅथीक उपचार -

      होमियोपॅथीमध्ये बध्ध्दकोष्टतेसाठी प्रभावी औषधे आहेत परंतु मलावरोध हा आजार नसून एक लक्षण आहे त्यामुळे त्या मागचे मूळ कारण जसे- पचनसंस्थेशी संबंधित आजार किंवा इतर आजार, औषधांचे दुष्परिणाम वा जीवनशैली शोधून काढून त्यावर उपाययोजना कारणे आवश्यक ठरते. त्यामुळे हा त्रास कायमचा बरा होऊ शकतो. या बरोबरच, आहारातील बदल, पुरेसे पाणी आणि व्यायामाचाही फायदा होतो. होमीयोपॅथीमध्ये वरकरणी दिसणाऱ्या लक्षणांपेक्षा आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केले जातात त्यामुळेच होमीयोपॅथीमध्ये आजाराचा समूळ नाश होतो.