Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Moving Forward with...

     ‘The problem’ takes something out of you as well as gives you something about you which you were never aware of. We all want to do something to palliate the pain of loss or to turn grief into something constructive... something positive-we all try to find that silver lining in dark clouds. There is no shame in holding on to grief, as long as you make room for other things too. I have seen some people took it too much to their heart and carry the emotions associated with them, get stuck. Some people come out of it strong, tolerant, and calm-composed. Healing does not mean damage never existed. It means the damage no longer controls our lives

      People, who are stuck, can feel the emotional pain as fresh as it was. Mostly they complain about problems. They always have problem-centric questions- Why me? What’s wrong with me? What will happen if things go wrong? Answer of their “Why” you get into their childhood or past. These problem-centric questions bound to get problem-centric answers..! According to Neuroscience, this continuous negative talk diminishes wiring of neurons. Behaviour science tells us that it leads to conditioning & emphasising weird behaviour. Biochemically it leads to firing negative chemicals (stress hormones) in our body & marinating them.

      So ultimately it results in suffering from a long term dysfunction or a wide variety of problems. Then it is not related to ‘the problem’. It’s about who is ‘staying stuck’ and who is ‘moving forward’.

      I remember a quote here- Whenever someone is grieving, I do not say “forget it” or “it will pass” or “it could be worse” all of which deny the integrity of the painful experience that person is going through...

      But I say, to the contrary,” It is worse than you may allow yourself to think...Delve into the depth...Stay with the feeling...Think of it as a precious source of knowledge & guidance...Then and only then will you be ready to face it and be transformed in the process.. This road to ‘moving forward’ from the problem will not be that smooth! It will be a bumpy ride.

      The first bump will be - EGO- here the person says, You don’t know my problem...You don’t know what I am suffering from...I am a special case. If I am thinking like this then I am going to stay here devastated in my problem. Second bump will be – FEAR- My life is a disaster...It’s not going to solve... It’s permanent failure. It’s actually a lie you are telling to yourself. Third bump will be- PRIDE – I was right...They should appreciate me. Those who are wrong need to change not me. “It takes two to make a quarrel” When you overcome these bumps, a massive change will sure to happen. Persist till desired change happens. ‘Sometimes you need to change yourself to be yourself’.

मन करा रे प्रसन्न...

      'मुविंग फॉरवर्ड' म्हणजे नक्की काय बरं? मी क्लासिकल होमीओपॅथ असल्यामुळे माझे पेशंट माझ्याबरोबर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी खूप बोलतात. असे बरेच पेशंट्स भेटतात ज्यांनी आयुष्यात खूप मोठे ताण, अपमान, भरून न येणारे नुकसान किंवा सांत्वन करण्या पलीकडचे दुःख सहन केलेलं असतं. काही लोक त्या घटनेतून बाहेर येऊच शकत नाहीत तर काही लोक मात्र त्या घटनेनंतर आमूलाग्र बदललेले असतात.

      आयुष्यातील प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी देऊन जाते. आधीचे आपण आणि नंतरचे आपण यात निश्चितच बदल असतो. प्रत्येक अडचणीनंतरचे आपण ' नवीन ' असतो. सोडून दे ...विसरून जा...काळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध आहे...असं बोलणं खूप सोप्प असतं. खरंच काळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध असतं का? आत खोलवर ..कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ...सगळं जसं च्या तस्स असतं...पुसटसं का होईना..! काळानुसार जखमा बऱ्या होत नाहीत , आपला संयम मात्र वाढतो.

      खरंतर ..येणारी प्रत्येक समस्या आपल्याला आपलीच एक नवी ओळख देऊन जाते. दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. विधायक कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतो. काळ्या ढगांची ती रुपेरी किनार आपण शोधतो..! मनात दुःख असूनही तुम्ही स्वतःला विधायक कामात गुंतवून घेतलं असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. पण काही माणसं दुःख कवटाळून बसतात मग तिथेच अडकून बसतात. तर काही माणसं दुःख झेलल्यानंतर अधिकच शांत, संयमी, सामर्थ्यशाली होतात...उजळून निघतात. शेवटी दुःख सहन करणं म्हणजे काय...दुःखाचा समूळ नाश होणं नाही तर दुःखाला तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ न देणं.

      अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या त्या वेळच्या भावना अगदी जशाच्या तश्या आठवत असतात. बऱ्याचदा हे लोक जीवनातल्या समस्यांविषयी बोलत असतात. त्यांच्याकडे नेहमी समस्याकेंद्रित प्रश्न असतात. - मीच का? - माझं काय चुकलं ? - तसं झालं तर काय होईल? त्यांच्या 'का? ' ची उत्तरं त्यांच्या बालपणात किंवा भूतकाळात सापडतात. अश्या समस्याप्रधान प्रश्नांना समस्याप्रधान उत्तर मिळतात.

      नुरोसायन्सप्रमाणे , अश्या सततच्या निराशावादी बोलण्यामुळे मेंदूतील नुरॉनच्या वायरिंग मध्ये बदल होतो. behaviour सायन्स सांगत कि यामुळे तुमच्या वागणुकीवर विपरीत परिणाम होतो. bio-chemically तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स स्रवले जातात. याचा परिणाम म्हणजे विविध शरीर संथांच्या कार्यात बिघाड , तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी. आता या सगळ्याचा ' त्या समस्येशी' काहीही संबंध उरत नाही. प्रश्न उरतो तो कोण दुःख उगाळत बसलं? आणि कोण दुःखाला मागे सारून पुढे आलं ?

      पहिली ठेच -अहंकार - यात लोक म्हणतात..".तुम्हाला नाही माहित माझं दुःख " "तुला नाही कळणार मी काय सहन केलंय " "मी विशेष आहे" असा विचार केला तर दुःखाचा उदो उदो करण्यात माझं आयुष्य वाया जाईल. दुसरी ठेच - भीती - यात लोक म्हणतात..." माझं आयुष्य म्हणजे एक अरिष्ट आहे" " याला काहीच उत्तर नाही" "मी अपयशी आहे" खरंतरं तुम्ही स्वतःची खोटी समजूत घालत असता. तिसरी ठेच - गर्व - मीच बरोबर होतो. त्यांनी माझं कौतुक करायला हवं. जे चुकताहेत ते बदलतील, मी नाही.

      टाळी एका हाताने वाजत नाही. या तीन ठेचा पार केल्यानंतर नक्कीच भरीव बदल घडतील. तुम्हाला हवे असलेले बदल घडेपर्यंत चिकाटी सोडायची नाही. ‘ कधी कधी स्वतःला शोधण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं.’