Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Fibroids

      Fibroids are abnormal growths that develop in or on a woman’s uterus. Sometimes these tumours become quite large and cause severe abdominal pain and heavy periods. In other cases, they cause no signs or symptoms at all. The growths are typically benign, or noncancerous. The cause of fibroids is unknown. Fibroids are also known as Myoma, Fibroma and Leiomyoma. However, most women don’t have any symptoms and may never know they have fibroids.

Causes of Fibroid

      It’s unclear why fibroids develop, but several factors may influence their formation. Hormones - Estrogen and Progesteron are the hormones produced by the ovaries. They cause the uterine lining to regenerate during each menstrual cycle and may stimulate the growth of fibroids. Family history - Fibroids may run in the family. If your mother, sister, or grandmother has a history of this condition, you may develop it as well Pregnancy - Pregnancy increases the production of estrogen and progesterone in your body. Fibroids may develop and grow rapidly during pregnancy..

      Symptoms Symptoms will depend on number of tumours you have as well as their location and size. A small size tumour in menopausal woman may not give any symptom as during menopause, there is drop in levels of Estrogen & Progesteron. · Heavy bleeding with clots between or during your periods. · Pain in the lower abdomen or lower back. · painful menstruation · Increased urination · Constant urging for stool · Painful intercourse · menstruation that lasts longer than usual · Fullness or pressure in lower abdomen · Swelling or enlargement of lower abdome

Complications

      - Anaemia due to excessive heavy bleeding - Interference with growth of fetus during pregnancy - Could cause problem during delivery - Infertility

Treatment

      Hysterectomy – Surgical removal of uterus is often advised. But this surgical removal leads to abrupt menopause. This abrupt disruption in the production of hormones will cause symptoms that are more severe as compared to natural menopause. Myomectomy – It is the surgical removal of the Fibroid while preserving the uterus. Often recurrences are observed after this.

Homoeopathic Treatment for Fibroids
Homeopathy can help you avoid Hysterectomy

      . Homoeopathic remedies tend to balance the hormones, cure the fibroids and reduce heavy menstrual bleeding. They are natural, effective and can be used even during pregnancy. The length of treatment varies depending on the size and number of fibroids. In most cases, fibroid induced bleeding, pain, urinary frequency etc. resolve within a month or two. Homeopathy is a holistic treatment so the medicine not only cures your fibroid but also improves your overall health.

गर्भाशयातील फायब्रॉइड

      फायब्रॉइड म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयात किंवा गर्भाशयावर असलेली पण सहसा न आढळणारी गाठ. काही वेळा या गाठी खूप मोठ्या होत जातात आणि त्यामुळे पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होतो आणि पोटातही खूप दुखते. आणि काही वेळा काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. बऱ्याचदा या गाठी सौम्य असतात आणि कर्करोगाच्या नसतात. पण फायब्रॉईड कशामुळे होतं त्याची कारणं अजूनही अज्ञातच आहेत. फायब्रॉईडलाच फाइब्रोमा,मायोमा किंवा लियोमायोमा असेही म्हणतात. बऱ्याच बायकांमध्ये काहीच त्रास नसल्यामुळे फायब्रॉईड आहे असं लक्षांत सुद्धा येत नाही.

फायब्रॉईडचे प्रकार -

      गर्भाशयाचे ३ थर असतात. फायब्रॉईड कुठल्या थरात आहे त्यावरून त्याचा प्रकार ठरतो. त्याचे आकार वेगवेगळे असतात. त्याची वाढ हळूहळू होते. फायब्रॉईड गर्भपिशवीमध्ये, गर्भाशयाच्या भिंतीमध्ये, गर्भमुखाशी किंवा गर्भपिशवीच्या बाह्य आवरणावर देखील आढळतात. फायब्रॉईड होण्याची कारणे फायब्रॉईड नक्की कशामुळे होतात ते आपणास जरी ठाऊक नसले तरी काही घटकांचा फायब्रॉईड तयार होण्यामागे नक्कीच प्रभाव पडतो. १. हॉर्मोन्स ( संप्रेरके)- इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन्स ओव्हरीमध्ये तयार होतात.त्यांच्या प्रभावामुळे दर मासिक पाळीमध्ये गर्भपिशवीचे आवरण पुन्हा तयार होते. यामुळे फायब्रॉईडची वाढ होऊ शकते. २. अनुवंशिकता- ३. गरोदरपण - गरोदरपणामध्ये शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढते. त्यामुळे फायब्रॉईडदेखील तयार होऊ शकतात आणि वेगाने वाढू शकतात.

लक्षणे

      गाठींची संख्या, आकार आणि जागा याप्रमाणे लक्षणे ठरतात. एखाद्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीमध्ये एक छोटी गाठ काहीही लक्षणे दाखवणार नाही. कारणं या वेळेस इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी झालेले असते. - पाळीच्या वेळेस किंवा इतर वेळी देखील खूप रक्तस्त्राव होणे. - ओटीपोटात किंवा कमरेत दुखणे. - पाळीच्यावेळेस दुखणे. - लघवीचे प्रमाण वाढणे. - सारखे शौचास जाण्याची भावना होणे. - संबंध ठेवताना वेदना होणे. - पाळीचे जास्त दिवस अंगावरून जाणे. - ओटीपोटामध्ये जड वाटणे. - ओटीपोटाला सूज किंवा फुगणे.

गुंतागुंत

      - अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ऍनिमिया - गर्भारपणात गर्भाच्या वाढीत समस्या निर्माण होणे. - प्रसूतीच्या वेळेस समस्या निर्माण होणे. - व्यंधत्व

उपचार

      हिस्टरेक्टोमी म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे गर्भपिशवी काढून टाकणे. परंतु यामुळे तडकाफडकी रजोनिवृत्ती येते. नैसर्गिकरीत्या होणाऱ्या रजोनिवृत्तीपेक्षा याची लक्षणे तीव्र असतात. मायोमेक्टोमी - यामध्ये गर्भपिशवी तशीच ठेवून केवळ गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली जाते. परंतु यात गाठ पुन्हा तयार होते असे दिसून आले आहे.

फायब्रॉईडसाठी होमीयोपॅथीक उपचार

      होमियोपॅथीमुळे शस्त्रक्रिया टाळता येते. होमीयोपॅथीक औषधांमुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात. पाळीचे दुखणे आणि रक्तस्त्राव आटोक्यात आणता येतो तसेच गाठ देखील बरी होते. होमियोपथिक औषधे नैसर्गिक आणि प्रभावी असल्यामुळे गरोदरपणात देखील वापरणे सुरक्षित असते. उपचारांचा कालावधी हा गाठींची संख्या व आकारावर अवलंबून असते. बऱ्याच रुग्णांमध्ये फायब्रॉईडची लक्षणे जसे - रक्तस्त्राव, वेदना इ. महिनाभरात कमी होतात. होमीयोपॅथीक औषधांमुळे तुमचे आरोग्यही सुधारते. फायब्रॉईड म्हणजे काय ? हे कशामुळे होते? होमियोपॅथीने फायब्रॉईड बरा होतो का?