Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Poor Appetite in children

      As a doctor, I come across the problem of poor appetite in children. Sometimes the child who was a good eater suddenly loses his appetite. Sometimes, child is fussy since beginning. Usually the mother is very much anxious about the child’s health. If the child is having lean thin built then it becomes an added stress as neighbours, relatives keep on commenting, this is serious and how the mother is not paying attention to it.... We will consider, what are the reasons for poor appetite in children? The poor appetite of their kids is a common complaint among mothers. In most of the cases, kids make up for their poor diet by eating more at the next meal. For kids over 1 year old, appetites increase and decrease according to age, energy levels etc. This is a common problem among young children between the ages of 2 to 6 years. However, if weight loss accompanies your toddler’s loss of appetite, then you must consult a doctor to identify the cause & correct it

Causes of Loss of Appetite in Children:
1. Slow Growth Rate:

      During the first year, children grow rapidly. But after the first birthday the growth of the child slows down, and she may eat less food now. During this time, a decline in appetite is perfectly normal.

2. Sickness:

      Illness can often cause a significant loss of appetite in children. If your child is suffering from sore throat, stomach flu, diarrhoea, headache, fever or other symptoms, then she may eat lesser than what she normally eats. Thankfully, most of the children recover their appetite when they get better.

3. Stress:

      Stress can have many negative effects on toddlers and young children, including loss of appetite. If you find your child is losing interest in eating or having a hard time sleeping, then she may be suffering from stress. To cure the poor appetite of your kid, you need to identify the cause of her stress and alleviate it. Some common causes of stress during childhood are: · Family issues like a death in the family, death of a pet or the birth of a sibling. · Bullying · Inability to cope with academic pressure and the impractical expectations of parents

4. Depression:

     Depression can be another reason for child’s loss of appetite. Most of the parents mistake depression for sadness. But sadness and depression are not the same. It is important for you to understand the difference between sadness and depression so that your child can get the help she needs. Feelings of sadness go away with the passage of time, but depression does not. Depression not only makes the child sad, but also interferes with her normal life. If your child shows a lack of interest in activities that she previously enjoyed performing, then chances are that she may be suffering from depression.

5. Anorexia Nervosa:

      Sometimes, in a bid to ape their screen idols children develop a psychological aversion to eating. They try to go without eating as long as possible. Even when they eat, they choose a low-fat food and later feel guilty about eating it. If you can relate your child to this food fad, she may be suffering from Anorexia Nervosa.

6. Medications:

Several medications can take a toll on your child’s appetite. A loss of appetite in a child is a common side effect of antibiotics.

7. Anemia:

      Anemia is another possible cause of the decline in appetite among children. A low iron count is common in kids who don’t consume an iron-rich diet. Children suffering from Anemia seem weaker, tired and irritable than others. If left untreated, Anemia can interfere with your child’s development and school performance.

8. Intestinal Worms:

      Intestinal worms can cause loss of appetite in kids.

9. Constipation:

      Irregular bowel movements in children can lead to constipation. A loss of appetite in toddlers is a classic symptom of constipation.

Tips To Prevent A Loss Of Appetite In Children:

      Here are some handy tips to prevent a loss of appetite in children: Offer food that is also a visual treat for your kids. You can present healthy foods in a delicious avatar. · Do not argue or scold the children during the mealtime. · Adjust the meal schedules so that you serve food only when your child is hungry. · Encourage your child to make healthy food choices. · Allow your child to snack between the meals. · Serve small portions at regular intervals. · Encourage your child to be more physically active. · Do not force your child to eat if she is not hungry. As a parent, demanding that she finishes the food on her plate is a bad idea. Remember, it is common for children to lose their appetite, so don’t be alarmed every time it happens. If your child is healthy, happy and can sleep well, then there is no need to worry. But a prolonged loss of appetite needs medical attention. So keep an eye on your child’s eating habits.

      You’re more likely to get gout if you: · are a middle-aged man or postmenopausal woman · have parents, siblings, or other family members with gout · Eat too much purine-rich food, such as red meats, organ meats, and certain fish. The build-up of uric acid in your blood from the breakdown of purines causes gout. · Certain conditions, such as blood and metabolism disorders or dehydration, make your body produce too much uric acid. · A kidney or thyroid problem, or an inherited disorder, can make it harder for your body to remove excess uric acid. · Drink alcohol · Take medications such as diuretics and cyclosporine.

Homeopathy for poor Appetite in children-

      Homeopathy have excellent medicines to improve appetite and digestion, assimilation. It is seen that the sick child does not lose her appetite when on homoeopathic treatment.

मुलं जेवायला कंटाळा करतात...

      डॉक्टर असल्याने मी बऱ्याचदा पाहते की मुलं जेवायचा कंटाळा करतात. कधी कधी एखादं छान जेवणारं मुल खाणं कमी करतं. कधी कधी सुरवातीपासूनच खाण्याच्या बाबतीत मुलाचे नखरे असतात. यामुळे मुलाच्या आईला त्याच्या आरोग्याविषयी सतत चिंता वाटत राहते. आणि जर का मुलाची अंगकाठी बारीक असेल मग तर विचारूच नका. शेजारी, नातेवाईक सगळेच तिला, ही खूप गंभीर समस्या आहे...तुझं दुर्लक्ष होतंय ...असं बोलून भंडावून सोडतात.

     आज आपण बघूया मुलं जेवायचा कंटाळा का करतात? मुलं नीट जेवत नाहीत ही सगळ्याचं आयांची तक्रार असते. आणि मुलं मात्र एकावेळी नाही जेवली तर दुसऱ्या वेळी जास्त जेऊन त्याची भरपाई करूनही टाकतात. एक वर्षाच्या मुलांची भूक त्यांचं वय आणि ऍक्टिव्हिटी प्रमाणे बदलत राहते. आणि २ ते ६ वयोगटाच्या मुलांमध्ये तर ही अगदी सर्वसामान्य तक्रार असते. पण भूक कमी होत असताना जर वजनही कमी होत असेल तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून, कारण शोधून योग्य ते उपचार करायलाच हवेत.

मुलांना भूक न लागण्याची कारणे:
१. वाढीचा वेग मंदावणे.
< class="mb-4">       पहिल्या वर्षांमध्ये मुलाची वाढ झपाट्याने होते. पहिल्या वाढदिवसानंतर मात्र वाढीचा वेग कमी असतो त्यामुळे आता भूक कमी होऊ शकते. आणि हे अगदी नॉर्मल आहे.
२. आजारपण

      आजारपणात मुलांची भूक लाक्षणिकरीत्या कमी होऊ शकते. जसे - घसा दुखणे, ताप, डोकेदुखी, जुलाब, किंवा इतर काही आजार, यात मुलांची भूक कमी होऊ शकते. पण चिंतेचं काहीच कारण नाही. कारण, बरं झाल्यावर मात्र मुलांची भूक परत पहिल्यासारखी होऊन जाते.

३. ताण- तणाव

      ताण- तणावाचे लहान तसेच मोठ्या मुलांवरही नकारात्मक परीणाम होत असतात. जसे - भूक कमी होणे. जर मुलाची भूक कमी झाली असेल आणि झोपही येत नसेल तर मुलाला ताण असल्याची शक्यता आहे. अशावेळी भूक सुधारण्यासाठी तुम्ही पहिले ताणाचं कारण शोधून त्याचा निचरा करायला हवा. लहान मुलांमधील ताणाची कारणं - · कौटुंबिक - कुटुंबात एखादा मृत्यू, पाळीव प्राणी दुरावणे,भावंडांचा जन्म. · बुलिंग - दादागिरी · अभ्यासाचा ताण आणि आई-वडलांच्या अवास्तव अपेक्षा

४. नैराश्य

      नैराश्य हे मुलांची भूक कमी होण्यामागचं अजून एक कारणं. बऱ्याच पालकांना नैराश्य आणि दुःखी असणे सारखंच वाटत. परंतु, दुःखी वाटणं आणि नैराश्य येणं यातला फरक समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तरच तुम्ही तुमच्या मुलाला मदत करू शकता. दुःखी वाटणं हे तात्पुरतं असू शकतं पण नैराश्य नाही. नैराश्याने ग्रासलेलं मुलं दुःखी राहतं इतकंच नाही तर त्याचा रोजच्या आयुष्यावरही खूप परीणाम दिसतो. जर तुमच्या मुलाला काही गोष्टी करायला उत्साह वाटत नसेल; ज्या खरंतर त्याच्या खूप आवडीच्या आहेत, तर त्याला नैराश्य असण्याची दाट शक्यता आहे.

५. भूक मंदावणे.

      कधी कधी चित्रपट सृष्टीतील आपल्या आदर्शासारखं होण्याच्या वेड्या नादात मुलं खाणं सोडून देतात. ते अतिशय कमी खातात किंवा लो फॅट असलेले पदार्थ खातात. आणि जास्त खाल्ल्यास त्यांना अपराधी वाटू लागते. असं असल्यास त्यांना अनोरेक्सिया नर्वोसा असण्याची शक्यता आहे.

६. औषधे

      बऱ्याच औषधांमुळे मुलांची भूक कमी होते. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) चा तर कॉमन दुष्परिणाम भूक कमी होणे हा आहे.

७. ऍनिमिया

      ऍनिमिया हे भूक कमी होण्यामागचं महत्वाचं कारणं आहे. लोह कमी असणे हे देखील बऱ्याचदा दिसून येते. ऍनिमिया असलेली मुले अशक्त, दमलेली आणि चिडचिडी असतात. वेळीच उपचार न केल्यास याचा परीणाम मुलांची वाढ तसेच शालेय कामगिरीवर दिसून येतो.

८. कृमी (जंत)

     जंत असल्यास मुलांची भूक कमी होऊ शकते.

९. बद्धकोष्टता

      वेळच्यावेळी शौचाला न जाण्यामुळे बद्धकोष्टता होऊ शकते. लहान मुलांमध्ये तर पोट साफ न झाल्यास भूक लागत नाही असे बऱ्याचदा दिसून येते.

मुलांची भूक मंदावू नये यासाठी घ्यायची काळजी

      मुलांना खाऊ देताना तो पौष्टिक तर असावाच पण तो दिसायलाही आकर्षक असावा याची काळजी घ्या. अथवा आकर्षक रीतीने त्याची मांडणी करा. ü जेवताना मुलाशी वाद घालणे किंवा ओरडणे टाळा. ü जेवणाच्या नियमित वेळा पाळा म्हणजे भूक लागल्यावर जेवणच देता येईल. ü मुलाला पौष्टिक खाण्यासाठी प्रवृत्त करा . ü दोन जेवणाच्या मधल्या वेळेत मुलाला वरचा खाऊ द्या. ü ठराविक वेळाने थोडं थोडं खायला द्या. ü भूक नसल्यास जबरदस्तीने खायला लावू नका. हे अतिशय चुकीचं आहे. मुलांना भूक न लागणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे लगेचच याची चिंता करत बसू नका. जर तुमचं मुलं आजारी पडत नाही, पुरेशी झोप घेत, आनंदी राहतं तर चिंतेचं काहीच कारणं नाही.परंतु, बऱ्याच काळापर्यंत भूक कमीच रहात असेल तर मात्र लक्ष द्यायला हवं. त्यामुळे मुलाच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष राहू द्या.

भूक लागण्यासाठी होमीयोपॅथीक उपचार

      भूक लागण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी होमियोपॅथीमध्ये अतिशय प्रभावी औषधे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे होमीयोपॅथीक उपचार चालू असताना, मुलं आजारी असले तरी त्याची भूक मंदावत नाही.