Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Gout

      Gout is a type of arthritis that causes intense pain, swelling, and stiffness in a joint. It is the body's reaction to irritating crystal deposits in the joints. It usually affects the joint in the big toe. Gout attacks can come on quickly and keep returning over time, slowly harming tissues in the region of the inflammation, and can be extremely painful. Hypertension, Cardiovascular diseases, and Obesity are risk factors for gout. It is the most common form of inflammatory arthritis in men, and although it is more likely to affect men, women become more susceptible to it after the menopause

     If you have gout, you’ll probably feel swelling and pain in the joints of your foot, particularly your big toe. Sudden and intense pain, or gout attacks, can make it feel like your foot is on fire. When uric acid levels get high, they can form crystals, which lodge in and around the joints, causing a gout attack. But not everyone with high uric acid levels develops painful gout. How Gout develop? An excess of uric acid in the blood brings on gout. Uric acid comes from two places –body produces it and we get it from diet. Any extra uric acid usually filters through the kidneys and gets passed in urine. If the body produces too much uric acid or fails to excrete it in the urine, crystals of monosodium urate form in the joints and tendons. These crystals cause intense inflammation leading to pain swelling and redness.

      Gout Triggers – You’re more likely to get gout if you: · are a middle-aged man or postmenopausal woman · have parents, siblings, or other family members with gout · Eat too much purine-rich food, such as red meats, organ meats, and certain fish. The build-up of uric acid in your blood from the breakdown of purines causes gout. · Certain conditions, such as blood and metabolism disorders or dehydration, make your body produce too much uric acid. · A kidney or thyroid problem, or an inherited disorder, can make it harder for your body to remove excess uric acid. · Drink alcohol · Take medications such as diuretics and cyclosporine.

      Homoeopathic management of Gout Mild cases may be controlled by diet alone. Homeopathy has effective medicines to manage the acute pain in Gout. Recurring attacks of gout require long-term constitutional Homoeopathic Medicine to prevent damage to bone and cartilage and deterioration of the kidneys.

गाऊट (संधिरोग)

      गाऊट म्हणजे सांध्यांमध्ये अतिशय तीव्र वेदना,सूज आणि ताठरता असलेला संधिवात. सांध्यांमध्ये जमा झालेल्या त्रासदायक स्फटिकांप्रती शरीराने दिलेली ही प्रतिक्रिया असते. शक्यतो ही लक्षणे पायाच्या अंगठ्यात दिसून येतात. गाऊटचे अटॅक अचानक आणि सतत येत रहातात. यामुळे दाह होत असलेल्या ठिकाणच्या पेशींना इजा पोहोचते आणि अतिशय वेदना होतात. उच्चरक्तदाब , हृदयरोग आणि लठ्ठपणा हे गाउटसाठी जोखीमकारक घटक आहेत. शक्यतो हा आजार पुरुषांमध्ये दिसून येतो परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्येही याची लक्षणे दिसून येतात. जर तुम्हाला गाऊट असेल तर तुम्हाला पायाच्या सांध्यात सूज, तीव्र वेदना जणू आग होते आहे असे जाणवते.

     गाऊट नक्की कसा तयार होतो? शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले की त्याचे स्फटिक तयार होतात. ते सांध्यात किंवा आजूबाजूला जमा होतात आणि गाऊटच दुखणं सुरु होतं. पण युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेल्या प्रत्येकालाच गाउटचा त्रास होतो असं नाही. आपल्या शरीरात युरिक ऍसिड दोन ठिकाणातून येतं. एक म्हणजे शरीर स्वतः ते तयार करतं आणि दुसरं म्हणजे आपल्या आहारातून. अतिरिक्त युरिक ऍसिड किडनीमध्ये फिल्टर होऊन लघवीवाटे बाहेर टाकले जाते. जर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार झालं किंवा ते लघवीवाटे बाहेर टाकलं गेलं नाही तर मोनोसोडियम युरेटचे स्फटिक सांधे आणि स्नायुबंधांमध्ये तयार होतात. या स्फटिकांमुळे दाह निर्माण होऊन तीव्र वेदना आणि सूज येते.

      वेदना आणि सूज येते. गाऊट होण्याची शक्यता कोणाला जास्त आहे? - मध्यमवयीन पुरुष किंवा रजोनिवृत्ती झालेली स्त्री - अनुवंशिकता - अन्नामध्ये प्युरीनच प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे. जसे - लाल मांस, काही मासे इ. प्युरीनच्या ब्रेकडाऊन मुळे युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. - रक्त आणि चयापचयाशी संबंधित काही आजार तसेच डिहायड्रेशन मध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. - किडनी, थायरॉईड आणि काही अनुवांशिक आजारांमध्ये युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्यावर मर्यादा येतात. - दारूचे सेवन - काही औषधे जसे - डाययुरेटिक्स, सायक्लोस्पोरिन्स

      गाउटसाठी होमियोपॅथी सौम्य लक्षणे असल्यास केवळ आहारातील बदलांमुळेही अराम पडू शकतो. गाउटच्या तीव्र वेदना आटोक्यात आणण्यासाठी होमियोपॅथीमध्ये प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. वारंवार येणाऱ्या दुखण्यामुळे हाडे , कुर्चा तसेच किडनीला इजा पोहोचू नये म्हणून दीर्घकाळ पर्यंत प्राकृतिक होमीयोपॅथीक औषध चालू ठेवावे लागते. गाऊट म्हणजे काय? होमीयोपॅथीने गाऊट बरा होऊ शकतो का?