Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Sinusitis

      The sinuses are small air pockets. There are many types of sinus in our body, but sinusitis affects the Para nasal sinuses, located behind your forehead, nose, cheekbones, and in between the eyes. These spaces behind the face lead to the nasal cavity. The Para nasal sinuses have the same mucous membrane lining as the nose. The sinuses produce mucus, which is a thin and flowing liquid that protects the body by trapping and moving germs away and keeps the nasal passages moist.

      Sometimes, bacteria or allergens can cause too much mucus to form, which blocks the openings of your sinuses. Excess mucus is common if you have a cold or allergies. This mucus build up can become thick and encourage bacteria and other germs to build up in your sinus cavity, leading to a bacterial or viral infection.

Sinusitis occurs when mucus builds up and the sinuses become inflamed.

      Conditions that can cause sinus blockage include: · The Common Cold · Allergic Rhinitis, which is swelling of the lining of the nose · Small growths in the lining of the nose called Nasal Polyp. · A Deviated septum, which is a shift in the nasal cavit

Types

      · Acute Sinusitis usually starts with cold like symptoms such as a runny, stuffy nose and facial pain. It may start suddenly and last 2-4 weeks. · Sub acute sinusitis usually lasts 4 to 12 weeks. · Chronic inflammation symptoms last 12 weeks or longer. · Recurrent sinusitis happens several times a year.

The symptoms of Sinusitis are similar to those of a common cold. They may include

      · a decreased sense of smell · fever · stuffy or runny nose · headache from sinus pressure · fatigue · cough

      It may be difficult for parents to detect a sinus infection in their children. Signs of an infection include: · cold or allergy symptoms that don’t improve within 14 days · a high fever (above 102°F or 39°C) · thick, dark mucus coming from the nose · a cough that lasts longer than 10 days

     Symptoms of acute, sub acute and chronic sinus infections are similar. However, the severity and length of your symptoms will vary.

Homoeopathic treatment for Sinusitis

      We can’t control external environment but we can always control our reactions towards the external environment. This is where Homeopathy differs from other system of medicine. Homeopathy stimulates body’s own healing processes by boosting Immunity. So during treatment, the number of attacks & severity of attack reduces.

सायनुसायटिस

     सायनस म्हणजे पोकळ जागा. आपल्या शरीरात अश्या बऱ्याच पोकळ जागा असतात. आपल्या नाकाच्या भोवताली म्हणजेच कपाळ,गाल,दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असे सायनस असतात. ह्या पोकळ्या नाकामध्ये उघडतात. या पोकळ्या आणि नाकाच्या आतील आवरण सारखेच असते. या पोकळ्यांमधून पातळसा द्राव स्रवला जातो. ज्याचा उपयोग बाहेरून येणाऱ्या जंतूंना पकडण्यासाठी तसेच नाकामध्ये ओलावा राहण्यासाठी होतो. जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा या द्रावाचे प्रमाण वाढते. कधी कधी यात जिवाणू , विषाणू, ऍलर्जनची वाढ होऊन द्राव अधिकच घट्ट आणि चिकट होतो. आणि त्यामुळे या पोकळ्यांचे दारच बंद होऊन जाते. अश्याप्रकारे संसर्ग झाल्यास यालाच सायनुसायटिस म्हणतात.

पोकळ्यांची दारे बंद होण्याची कारणे

      १. सर्दी २. ऍलर्जिक सर्दी ३. नाकातील गाठी ४. नाकाचे हाड वाढणे

प्रकार

      वरील सर्व प्रकारांमध्ये लक्षणे सारखीच दिसतात परंतु कालावधी वेगवेगळा असतो. १. तीव्र (Acute) संसर्ग - यात सर्दीची लक्षणे जसे- वाहते नाक, नाक चोंदणे, चेहरा दुखणे दिसतात. लक्षणे अचानक सुरु होतात. २-४ आठवडयापर्यंत राहू शकतात. २. Sub -Acute संसर्ग - ४ ते १२ आठवडे संसर्ग राहू शकतो. ३. जुनाट संसर्ग - लक्षणे १२ आठवडे किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ राहतो. ४. वारंवार होणार संसर्ग - वर्षातून बऱ्याच वेळा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे सायनुसायटिसची लक्षणे सर्दी सारखीच असतात.

      १. वाहणारे किंवा चोंदलेले नाक २. डोकेदुखी ३. वास न येणे ४. खोकला ५. थकवा ६. ताप

     लहान मुलांमध्ये सायनुसायटिसची लक्षणे समजून घेताना बऱ्याचदा पालकांना कठीण जाते. ती लक्षणे अशी असू शकतात. १. १४ दिवसांपेक्षा जास्त काळ असलेली सर्दी किंवा ऍलर्जी २. तीव्र ताप (१०२ फँ) ३. चिकट आणि दाट शेंबूड ४. १० दिवसांपेक्षा जास्त काळ असलेला खोकला.

सायनुसायटिससाठी होमीयोपॅथीक उपचार

      आपण बाह्यपरिस्थिती तर बदलू शकत नाही पण बाह्यपरिस्थितीप्रती आपल्या शारीरिक प्रतिक्रिया मात्र नक्कीच हाताळू शकतो. होमिओपॅथी आणि इतर वैद्यकीय शाखांमध्ये हाच महत्वाचा फरक आहे. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये दिले जाणारे 'प्राकृतिक औषध' तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.त्यामुळेच उपचार चालू असताना जसजशी तुमची प्रतिकारशक्ती वाढत जाईल तसतसे दोन अटॅक मधील अंतर वाढत जाते तसेच लक्षणांची तीव्रता कमी होते.