Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

ASTHMA

     We all have seen at least one of the asthmatic patients around us. It’s so common. The patient as well as the relatives, everyone feels tremendous fear, anxiety and exhaustion during the attack. Yes...the relative also..! Just imagine, after running fast for 40 minutes straight, you are allowed to breathe from a straw...How difficult it would be..? That’s somewhat is the state of an asthmatic patient during the attack. And watching our dear one gasping for air is also a painful experience. So today, I will try to explain about Asthma. Asthma is a condition in which your airway becomes narrow and swells and produces extra mucus. This can make breathing difficult and trigger coughing, wheezing and shortness of breath. For some people, asthma is a minor nuisance. For others, it can be a major problem that interferes with daily activities and may lead to a life-threatening asthma attack.

Why do people get Asthma? And how cans this disease is deadly?

      In people with Asthma, the airways are chronically inflamed, which can make them hyper responsive to certain triggers. · Exercise-induced asthma, which may be worse when the air is cold and dry · Occupational asthma, triggered by workplace irritants such as chemical fumes, gases or dust · Allergy-induced asthma, triggered by airborne substances, such as pollen, spores, cockroach waste or particles of skin and dried saliva shed by pets (pet dander) For people with asthma, when they get exposed to these. Asthma attack or exacerbation can occur.

But how exactly do such everyday factors lead to an Asthma Attack.

      If an Asthmatic is exposed to a trigger, the smooth muscles surrounding the airway contract and become narrow. Simultaneously, inside the airway, inflammation occurs and causes swelling and production of more mucus. Under normal conditions the body uses this mucus to trap and clear any foreign particles like pollen, dust. But during Asthma, it blocks the airway making it harder to breath. All this leads to symptoms of Asthma. A smooth muscle contraction leads to feeling of chest tightness. Excess mucus and increased inflammation cause coughing and creates wheezing noise because as the airway is constricting air whistles as it passes through the narrow space. These symptoms may make a person feel that they are running out of air. During asthma attack, the inflammation can make it harder to exhale than inhale. Overtime this leads to excess of air in lungs. This forces the body to work harder to move air in and out of them. Over time this can lead to reduce oxygen delivery to organ and tissues. Asthma symptoms vary from person to person. You may have infrequent asthma attacks, have symptoms only at certain times — such as when exercising — or have symptoms all the time.

Signs that your asthma is probably worsening include:

      · Asthma signs and symptoms that are more frequent and bothersome · Increasing difficulty breathing · The need to use a quick-relief inhaler more often it all in” will eventually reach an emotional breaking point. If one of your body systems is weakened, this is where a stress-related illness is most likely to develop. If your weakest point physically is your head, you’ll develop headache or backache or Urticaria or frequent colds and flu.

Role of Homeopathy in Asthma

      Homeopathic medicines are natural medicines and work by moderating our immune system which usually becomes over reactive in Asthma. As Immune system becomes stronger, its reaction to allergen reduces thus reducing frequency and severity of Asthma. Homeopathic remedies for Asthma are very effective and can cure Asthma permanently.

दमा

      दमा हा आजार इतका कॉमन आहे की आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला एकतरी दमेकरी पाहिलेला असतो. दम्याचा अटॅक आला की रुग्णा बरोबरच नातेवाइकांनासुद्धा तेवढीच भीती, चिंता आणि ताण जाणवतो. हो...नातेवाईकांना सुद्धा..! जरा कल्पना करा...सलग ४० मिनिटे वेगाने धावल्यानंतर जर तुम्हाला एका स्ट्रॉ मधून श्वास घ्यायला सांगितलं तर ते किती अवघड असेल? तशीच काहीशी अवस्था एखाद्या दमेकरी रुग्णाची अटॅक दरम्यान असते. आणि आपल्या जवळच्या माणसाला श्वासासाठी तडफडताना पाहणं हा एक वेदनादायी अनुभव असतो. म्हणूनच आज आपण समजून घेऊया, काय असतो हा दमा. दम्यामधे श्वासनलिका अरुंद होते. तिला सूज येते. आणि आत चिकट स्त्राव जमा होऊ लागतो. यामुळे श्वसनाला त्रास होतो. खोकला सुरु होतो आणि छाती भरून जाते. काही जणांसाठी दमा, एक छोटा आजार असू शकतो. तर काहीजणांना दम्यामुळे दैनंदिन कामातही अडथळे येऊ शकतात. काहीजणांसाठी हा जीवघेणा आजार ठरू शकतो.

     दमा नक्की कशामुळे होतो ? हा आजार जीवघेणा कसा काय ? कसरतीमुळे उद्भवणारा दमा - हा थंड कोरड्या हवामानामुळे वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी उद्भवणारा दमा - रसायनांचा धूर, निरनिराळे वायू, धूळ यामुळे होतो. अलर्जीमुळे होणारा दमा - वातावरणातले घटक जसे - परागकण, बीजाणू , झुरळे- कबुतरांची विष्ठा , प्राण्यांची लाळ, केस इत्यादी . दमेकरी लोक जेव्हा वरील गोष्टींच्या संबंधात येतात तेव्हा त्याचा दमा वाढतो किंवा त्यांना दम्याचा अटॅक येतो.

पण दैनंदिन आयुष्यातील या गोष्टींमुळे दम्याचा अटॅक कसा बरं येतो. ?

      जेव्हा दमेकरी संवेदनशील गोष्टींच्या संबंधात येतो तेव्हा, श्वसनमार्गाभोवतालचे स्नायू आकुंचन पावतात. आणि मार्ग अरुंद होतो. त्याचवेळी आतील बाजूस दाह होतो त्यामुळे सूज येऊन अधिकाधिक चिकट द्राव स्त्रवतो.सर्वसाधारणपणे या द्रावाचा उपयोग बाह्यघटक जसे - परागकण, धूळ इ. बाहेर फेकण्यासाठी होतो. पण दम्यामधे या द्रावामुळे श्वसनमार्ग बंद होऊन श्वसनाला त्रास होतो. या सगळ्यामुळे दम्याची लक्षणे दिसू लागतात. श्वसनमार्गाभोवतालचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे छातीवर वजन ठेवल्यासारखे किंवा दडपण वाटते. अधिकाधिक चिकट द्राव आणि दाह यामुळे खोकला येतो आणि छातीतून आवाज येतो. श्वसनमार्ग आकुंचन पावल्यामुळे हवा अरुंद जागेतून जाऊन शिटी वाजल्यासारखा आवाज येतो. आणि या सगळ्यामुळे श्वासोच्श्वास अपुरा पडू लागतो. दमेकरी रुग्णाला श्वास आत घेण्यापेक्षा बाहेर सोडणे कठीण होऊ लागते. आणि फुफ्फुसामध्ये हवा भरली जाते. त्यामुळे शरीराला अधिक जोर लावून श्वसन करावे लागते. मात्र शरीरातील अवयव आणि पेशींना ऑक्सिजन कमी पडू लागतो. दम्याची लक्षणे व्यक्तिगणिक वेगवेगळी असू शकतात. कुणाकुणाला क्वचितच दम्याचा अटॅक येतो जसे- व्यायाम करताना. तर कुणाला नेहमीच दमा असतो.

तुमचा दमा वाढत चाललाय, असं कधी समजायचं?

      दम्याची लक्षणे वारंवार आणि गंभीर होऊ लागलीत. ,श्वसन अधिकाधिक त्रासदायक होत चाललंय. ,इनहेलर चा वापर वाढलाय.

दम्यासाठी होमीयोपॅथीक उपचार -

      होमीयोपॅथीक औषधे नैसर्गिक स्वरूपात असतात आणि होमीयोपॅथीने प्रतिकारशक्ती वाढते. दम्यामधे प्रतिकारशक्तीच खालावलेली आणि अतिसंवेदनशील झालेली असते. होमीयोपॅथीक उपचारांदरम्यान रोगप्रतिकारशक्ती वाढत जाते. त्यामुळे ऍलर्जन प्रति असलेली संवेदनशीलता कमी होत जाते म्हणूनच दम्याच्या अटॅकची संख्या आणि तीव्रता कमी होत जाते. होमीयोपॅथीक उपचारांमुळे दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो.