Heel pain is an extremely common complaint with several common causes. It is important to make a correct diagnosis of the cause of the symptoms so that appropriate treatment can be given.
Common causes of heel pain include:
- Baxter nerve compression
- Plantar fasciitis
- Fat pad atrophy
- Achilles tendonitis
- Stress fractures of the calcaneus
1. Baxter nerve compression –
the posterior branch of tibia nerve get entrapped in the medial heel. It results in heel pain, paresthesia, abnormal sensation on the plantar aspect of the heel and medial heel tenderness.
Sprinters, dancers and gymnasts have well developed abductor hallucis muscles which will compress the nerve when the athletes are frequently on their toes.
2. Plantar fasciitis –
Irritation & swelling of the thick tissue on the bottom of the foot. The fascia can become inflamed and painful, making walking more difficult. Plantar fascist is most severe in the morning when patients first stand on their feet. Most common cause of plantar fasciitis relates to faulty structure of foot. For example people who have high arched foot or flat foot are more prone to develop plantar fasciitis. Wearing non-supportive footwear on hard surface or flat surface puts abnormal strain on fascia. People having long hours of standing or obesity or overuse also leads to plantar fasciitis.
3. Fat pad atrophy –
in fat pad atrophy the fat that cushions the calcaneous is thinned. This is common in elderly people and can cause significant pain while walking. H/o steroid injection.
4. Achilles tendonitis –
Due to overuse chronic injury happens to the tendon that joins the heel to the muscles of the lower leg. Achilles tendon gives us the ability to rise up on our toes, allowing for the act of walking, and Achilles tendonitis can make walking painful and difficult.
5. Stress fractures –
Stress fractures of the calcaneous can occur due to overuse injuries. The patient will experience weight bearing pain. Stress fracture injuries of the heel are typical of running sports due to the repetitive shock being placed on the heel.
Role of Homeopathy –
Homeopathy has effective medicines to treat heel pain. If needed proper exercises are given to the patient along with Homoeopathic medicines. Some patients with long standing severe pain require padding or physiotherapy also.
मनोकायिक आजार म्हणजे मानसिक कारणांमुळे होणारा किंवा वाढणारा शारीरिक आजार. पण खरं तर हा शारीरिक आजार नसतोच मुळी ! उदाहरणार्थ - हृदयाचा कुठलाही आजार नसताना केवळ अति ताणामुळे छातीत दुखणे.
मनोकायिक आजारासाठी बरीच कारणं असू शकतात. जसे- स्वभावविशेष, अनुवंशिकता किंवा परिस्थितीजन्य कारणे, संगोपन, अवलोकन वगैरे. मनोकायिक आजारांमुळे येणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक मर्यादांचा एखाद्याच्या आयुष्यावर कमी वा जास्त प्रभाव पडू शकतो. मानसिक आजारांचा उगम भावनिक ताण किंवा हानिकारक विचारांपासून होऊन प्रकटीकरण मात्र शारीरिक लक्षणात होतं. अश्या केसेसमध्ये बऱ्याचदा अतीव ताणामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती खालावलेली असते.
मनोकायिक आजारांविषयी मोठा गैरसमज म्हणजे ते काल्पनिक असतात ! मी पाहिलंय बऱ्याचदा रुग्ण वेगवेगळ्या तपासण्यांच्या ढीगभर फाईल घेऊन येतात , ज्या नॉर्मल असतात. पण बरं वाटत नसल्यामुळे डॉक्टर बदलत राहतात. शेवटी नातेवाईक आणि परिचित सांगतात कि रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे रुग्णाला काहीच झालेलं नाहीये आणि हे सारे मनाचे खेळ आहेत. मग मात्र रुग्ण हताश होतो कारणं त्याला त्रास तर होतं असतो. आणि कुणीही समजून घेत नसतं.
सर्वसाधारणपणे सगळ्या चाचण्या ह्या शरीरातील अवयवांचे कार्य तपासण्यासाठी केल्या जातात. मनोकायिक आजारांमध्ये दिसणारी शारीरिक लक्षणं मानसिक कारणांमुळे होतात किंवा वाढतात त्यामुळे शरीरातील अवयवांमध्ये काहीही तांत्रिक बिघाड नसतो.
खरं तर मन आणि शरीर या वेगवेगळे नाहीतच. अगदी सोप्या उदाहरणाने समजून घ्यायचं तर , ज्याप्रमाणे प्रेशर कुकर मध्ये वाफ कोंडली कि ठराविक वेळेनंतर शिट्टी होते. पण जर आपण शिट्टी होऊ नाही दिली आणि झाकण घट्ट धरून ठेवलं तर मात्र
वाल्व्ह उडतो म्हणजेच कुकरच्या, तुलनेने नाजूक असलेल्या जागेतून वाफ बाहेर पडते. त्याप्रमाणेच आपल्या मनात खूप भावना, विचार कोंडून राहिले. त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे निचरा झाला नाही तर ठराविक मर्यादेनंतर स्फोट होणार हे नक्की ! तुमच्याही शरीरातील तुलनेने नाजूक संस्थेमधून हा स्फोट होण्याची शक्यता असते. जर तुमचं डोकं तुलनेने नाजूक आहे तर तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.त्याचप्रमाणे कुणाला कंबरदुखी तर कुणाला अंगावर पित्त उठू शकतं. कुणाला वारंवार सर्दी - पडसं.
दीर्घकाळ ताण-तणावाचे विविध शरीरसंस्थांवर दूरगामी दुष्परिणाम होतात. जसे- पचनसंस्था, प्रजननसंस्था, हार्ट अटॅक, मेंदूला कमी रक्तपुरवठा होणे.शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूच्या पेशीमध्ये बदल होऊन सततची चिंता, नैराश्य असे मानसिक त्रास जडू शकतात.
ताण-तणाव तर आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत.त्यामुळे आपणच ताण-तणावाचं योग्य नियोजन करायला हवं.आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणजेच पोषक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे. तुमच्या ताणाचं योग्य कारण शोधून तणावमुक्त राहण्यासाठी शक्य तो उपाय केल्यास तुम्ही ताणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवू शकता आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.
याचा अर्थ मनोकायिक आजार केवळ मानसिक आरोग्याच्या चौकटीतूनच बघावे असं अजिबात नाही बरं का ! आधी सांगितल्याप्रमाणे मनोकायिक आजारांमधील शारीरिक लक्षणे अगदी खरी असतात. ताण-तणाव वाढल्यामुळे तुमच्या मेंदूमार्फत काही रसायन स्रवली जातात, ज्यामुळे तुमच्या पाठीत दाह किंवा सूज निर्माण होते आणि म्हणूनच अशाप्रकारे होणारी तुमची पाठदुखी ही अगदी खरी असते.
क्लासिकल होमिओपॅथी मध्ये आजाराबरोबरच आजारी माणसालाही समजून घेण्यावर भर दिला जातो. प्रत्येक रुग्णाची भावनिक आणि शारीरिक लक्षणे विचारात घेऊन औषध योजना केली जाते. आजाराचे मूळ शोधून उपचार केले जातात. त्यामुळे मनोकायिक आजारावर होमिओपॅथी ही एक उत्तम उपचारपद्धती आहे.