Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Kidney Stones – Causes & Prevention

     Kidney stones are one of the most painful medical conditions. Recent studies have shown that kidney stones rates are on the rise across the country. I see many patients of kidney stone in my clinic. Most of them do not have any family history of stone. They ask me why am I getting Kidney Stone? In this article I will try to explain it.

      Kidney stones, or renal calculi, are solid masses made of crystals. For most people, Natural chemical composition of urine keeps stone from forming & causing problem. Urine is formed with water as solvent and particles as solutes - such as Calcium, Sodium, and Chloride. Particles present in the urine joined together to form stone. Our urine contains inhibitors for stone formation such as citrate, magnesium etc. Decrease in water content or increase in solute contents or decrease in inhibitors leads to stone formation. The causes of kidney stones vary according to the type of stone.

     Kidney stones usually originate in your kidneys. However, they can develop anywhere along your urinary tract, which consists of these parts:

  • kidneys
  • ureters
  • bladder
  • urethra

Types of Kidney Stones

     Not all kidney stones are made up of the same crystals. The different types of kidney stones include:

1. Calcium - Calcium stones are the most common. They’re often made of calcium oxalate (though they can consist of calcium phosphate or maleate).

      However, even though some kidney stones are made of calcium, getting enough calcium in your diet can prevent stones formation. When you take Calcium and oxalate-rich foods together during a meal, the oxalate and calcium from the foods are more likely to bind to one another in the stomach and intestines before entering the kidneys. This will make it less likely that kidney stones will form.

2. Uric acid - This type of kidney stone is more common in men than in women. They can occur in people with Gout or those going through chemotherapy.
3. Struvite - This type of stone is found mostly in women with Urinary tract infection. These stones can be large and cause urinary obstruction. They result from a kidney infection. Treating an underlying infection can prevent the development of struvite stones.
4. Cystine - Cystine stones are rare. They occur in both men and women who have the genetic disorder Cystinuria. With this type of stone, cystine — an acid that occurs naturally in the body — leaks from the kidneys into the urine.
Symptoms

      Other symptoms of kidney stones can include: blood in the urine (red, pink, or brown urine) , vomiting , nausea , discoloured or foul-smelling urine , chills , fever , frequent need to urinate , urinating small amounts of urine In the case of a small kidney stone, you may not have any pain or symptoms as the stone passes through your urinary tract.

     Risk Factors for Kidney stone - Dehydration , Obesity , a diet with high levels of protein, salt, or glucose , Hyperparathyroidism , gastric bypass surgery , Inflammatory Bowel diseases that increase calcium absorption , Some medications

What is the most important factor to prevent kidney stone formation?

      Having kidney stones increase your risk of getting them again unless you actively work to prevent them. This means taking medicines as well as regulating your diet. If you currently have stones, your doctor will run diagnostic tests, to determine what type you have. They will then prescribe a specific diet plan for you. Tips that will help include:

· Hydrate with water. Be sure to keep well hydrated, especially when doing exercise or activities that cause a lot of sweating. Drink at least twelve glasses of water daily to produce a good amount of urine. So that you can avoid any build up of calcium or uric acid. · Drink citrus juices, such as orange juice · Eat and drink calcium rich foods such as milk, yogurt, ice cream and some cheese · Limit your intake of animal protein · Eat less salt, added sugar, and products containing high fructose. Extra sodium causes you to lose more calcium in your urine. Therefore, a high sodium diet can increase your chances for developing another stone. There are many sources of "hidden" sodium such as canned or commercially processed foods as well as restaurant-prepared and fast foods. · Avoid foods and drinks high in oxalates and phosphates. Oxalate is naturally found in many foods, including fruits and vegetables, nuts and seeds, grains, legumes, and even chocolate and tea. Some examples of foods that have high levels of oxalate include – Potato chips, peanuts, beets, spinach etc. · Avoid eating or drinking anything which dehydrates you, such as alcohol.

Role of Homeopathy in treating Kidney Stones

     > Renal stones can be effectively treated with Homeopathy. Homeopathy can help pass the stone and relieve pain. Homeopathy not only helps to flush out the stones but also alleviates the pain. Diet changes and medical treatment are individualized based on the type of stone. The Constitutional Medicine given in Classical Homeopathy can also prevent the recurrence of kidney stones. Now you must have understood how our Diet & Lifestyle is affecting our health and why there are increasing numbers of kidney stone patients.

मुतखडा - कारणे आणि प्रतिबंध

      मुतखडा हा एक अतिशय वेदनादायी आजार आहे. नवीन अभ्यासाअंती असं आढळून आलं आहे की आपल्या देशात मुतखड्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मी माझ्या दवाखान्यात बरेच मुतखड्याचे रुग्ण बघते. त्यातील बहुतेकांच्या कुटुंबात मुतखड्याचा आजार नसतो तरीदेखील आम्हाला हा त्रास का ? असा प्रश्न ते मला विचारतात. आज मी त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे. मुतखडा म्हणजे स्फटिकांचा बनलेला खडा. आपल्या लघवीच्या रासायनिक रचनेमुळे सहसा खडा तयार होत नाही. पाणी आणि त्यात विरघळणारे घटक जसे- कॅल्शियम, सोडियम, क्लोराईड यापासून लघवी तयार होते. लघवीमधील घटक एकत्र येऊन त्याचा खडा तयार होतो. लघवीमध्ये खडाप्रतिबंधक घटक जसे- मॅग्नेशियम, सिट्रेट सुद्धा असतात. समजा पाणी कमी झालं किंवा विरघळणाऱ्या घटकांचं प्रमाण वाढलं किंवा प्रतिबंधक घटकांचं प्रमाण कमी झालं. तर खडा तयार होऊ शकतो. मुतखडे मूत्रपिंडामध्ये (किडनी) तयार होतात. पण ते मूत्रवाहिनी (युरेटर), मूत्राशय(ब्लॅडर), मूत्रमार्ग (युरेथ्रा) मध्ये देखील आढळू शकतात.

मुतखड्याचे प्रकार -

      मुतखडे विविध घटकांपासून बनतात. १. कॅल्शियम - बहुतांश खडे कॅल्शियमचे असतात. बऱ्याचदा ते कॅल्शियम ओक्सालेटचे असतात. काही खडे कॅल्शियम फॉस्फेट किंवा मॅलेटचे असतात. मुतखडे जरी कॅल्शियमपासून तयार होत असले तरी, तुमच्या आहारात पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम असेल तर कॅल्शियमचे खडे तयार होत नाहीत बरं का ! जेव्हा तुम्ही कॅल्शियम आणि ओक्सालेटयुक्त खाद्यपदार्थ खाता तेव्हा किडनीमध्ये प्रवेश करण्याआधीच म्हणजेच पोटात आणि आतड्यात ,कॅल्शियम आणि ओक्सालेटचा संयोग होतो. त्यामुळे मुतखडा किडनी मध्ये तयार होत नाही. २. युरिक ऍसिडचे खडे - याप्रकारचे खडे शक्यतो पुरुषांमध्ये आढळतात. गाऊट चा आजार किंवा किमोथेरपी चालू असलेल्या रुग्णांमध्ये असे खडे तयार होऊ शकतात. लघवीमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यावर असे खडे तयार होतात. प्राणिजन्य प्रथिनांमधील प्युरीन या घटकामुळे लघवीतील आम्लाचे प्रमाण वाढते. जसे - मासे, मटण इ. ३. स्तृव्हाईट किंवा स्टॅगहॉर्न खडे - या प्रकारचे खडे, वारंवार लघवीचा संसर्ग होणाऱ्या महिलांमध्ये दिसून येतात. हे खडे आकाराने मोठे असतात त्यामुळे लघवीचा रस्ता अडवू शकतात. सततच्या संसर्गावर योग्य ते उपचार केल्यास असे खडे बनणे रोखता येते. ४. सिस्टीन चे खडे - हा फार विरळ प्रकार आहे. सिस्टीनुरिया नावाचा अनुवांशिक आजार असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये असे खडे दिसून येतात.

लक्षणे -

      आपल्याला माहीतच आहे की हा एक अतिशय वेदनादायी आजार आहे. एकदा का खडा खाली सरकायला लागला की तीव्र वेदना सुरु होतात. या कळा पाठीकडून पुढे लघवीच्या जागेपर्यंत येतात. कळा येत जात राहतात पण तीव्र असल्याने अस्वस्थ वाटते.

      - लघवीतून रक्त येणे. ( लाल,गुलाबी किंवा तपकिरी लघवी) - उलटी - मळमळ - लघवीला वास येणे - थंडी - ताप - वारंवार लघवीला जावेसे वाटणे - थोडी थोडी लघवी होणे

मुतखडयासाठी जोखीमकारक कारणे-

      - निर्जलीकरण (डिहायड्रेशन) - लठ्ठपणा - अतिप्रमाणात प्रथिने, मीठ किंवा शर्करायुक्त आहार - हायपर पॅराथायरॉइडिसम - गॅस्ट्रिक बायपास सर्जेरी - आतड्याचे आजार कारण यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात शोषला जातो. - काही औषधे

मुतखडयासाठी प्रतिबंधक उपाय -

      एकदा मुतखडा झाल्यावर योग्य ती काळजी न घेतल्यास परत परत मुतखडा होऊ शकतो. म्हणजेच औषधांबरोबर आहाराचेही नियोजन कारणे आवश्यक आहे. जर तुम्हाला आता मुतखडा असेल तर तुमच्या डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या करून कुठच्या प्रकारचा खडा आहे ते जाणून घ्या. त्याप्रमाणे आहारात बदल करा.खालीलप्रमाणे काही बदल करू शकता. - भरपूर पाणी प्या. विशेषतः व्यायामाच्यावेळी किंवा खूप घाम येतो तेव्हा भरपूर पाणी पिणं आवश्यकच आहे.त्यामुळे शरीरात कॅल्शिअम व युरिक ऍसिड साचून राहत नाही. - लिंबूवर्गीय फळांचे रस - कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणे जसे - दूध, दही, चीझ - प्राणिजन्य प्रथिनांचे कमी प्रमाणात सेवन - अतिप्रमाणात मीठ व साखर असलेले पदार्थ, बाहेरील खाद्यपदार्थ टाळणे. अतिप्रमाणात सोडियममुळे लघवीमध्ये जास्त कॅल्शियम सोडले जाते.त्यामुळे नवीन खडा तयार होण्याची शक्यता वाढते. - ओक्सालेट आणि फॉस्फेट असलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे टाळा. जसे- चॉकलेट, पालक, बीट, बटाटा वेफर्स , चहा, शेंगदाणा इ. - निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होईल असे पदार्थ टाळा जसे अल्कोहोल .

      दीर्घकाळ ताण-तणावाचे विविध शरीरसंस्थांवर दूरगामी दुष्परिणाम होतात. जसे- पचनसंस्था, प्रजननसंस्था, हार्ट अटॅक, मेंदूला कमी रक्तपुरवठा होणे.शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूच्या पेशीमध्ये बदल होऊन सततची चिंता, नैराश्य असे मानसिक त्रास जडू शकतात. ताण-तणाव तर आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत.त्यामुळे आपणच ताण-तणावाचं योग्य नियोजन करायला हवं.आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणजेच पोषक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे. तुमच्या ताणाचं योग्य कारण शोधून तणावमुक्त राहण्यासाठी शक्य तो उपाय केल्यास तुम्ही ताणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवू शकता आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.

मुतखडा आणि होमिओपॅथिक उपचार -

      मुतखड्यासाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी औषधे आहेत. खडा बाहेर लोटण्याबरोबरच वेदना कमी करण्यासाठी औषधाचा उपयोग होतो. खड्याच्या प्रकाराप्रमाणे आहार आणि व्यक्तीप्रमाणे औषध ठरवले जाते. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये दिले जाणारे प्राकृतिक औषध नवीन खडा तयार होण्यासदेखील प्रतिबंध करते. आजकाल मुतखडा होण्याचं प्रमाण वाढत का चाललं आहे तसेच आपल्या आहार आणि जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल!