One major source of confusion is the difference between having depressions and just feeling depressed. Almost everybody feels down time to time- getting a bad grade, losing a job, having an argument, even a rainy day can bring our feeling of sadness. Sometimes there is no trigger at all. It just pops up. When circumstances changed those sad feelings disappear.
Clinical Depression –
Clinical depression is different. Its medical disorder and it won’t go away just because you want it to. It lingers for at least 2 consecutive weeks and significantly interferes with once ability to work, play or love.
Still there is no clarity what causes Depression? It seems to have complex interaction between genes and environment. But we don’t have a diagnostic tool that can accurately predict where and when it will show up. Because depression symptoms are intangible, it is hard to know who might look fine but actually struggling. It is seen in research that it takes average of 10 yrs to ask for help for a patient of mental illness. Medication and therapy complement each other to balance brain chemicals.
Depression can affect anyone at almost any age. The reason why some people grow depressed is not always known. Researchers suspect there are actually many different causes of depression and that it is not always preventable.
WHO estimates 5% of men & 9% of women experience depressive disorders in any given year.
Symptoms –
Depression can have a lot of different symptoms.
Feeling – sadness, anger, guilt, hopelessness
Behaviour – social withdrawal, lack of energy, low motivation, poor concentration, sleep problems, significant changes in appetite.
Thoughts – poor self esteem, thoughts of suicide, loss of interest.
If you have 5 of these symptoms, you can be diagnosed for depression.
Depression can have physical manifestations inside the brain such as smaller frontal lobe, abnormal transmission of certain neurotransmitters like serotonin, nor epinephrine and dopamine. Circadian rhythm, changes in sleep cycle. Hormonal abnormalities such as high cortisol and deregulation of thyroid hormones.
Causes-
There are no of different things that can cause depression ranging from biological to environmental.
- A family history of depression
- Other factors that may play a role include childhood trauma, medications, life stress, poor self-esteem
- Women are especially prone to depressive disorders during times when their hormones are in flux, such as around the time of their menses, childbirth and peri-menopause.
- Hormone fluctuations caused by childbirth and thyroid conditions can also contribute to depression. Postpartum depression may occur after a woman has given birth, and is believed to result from the rapid hormonal changes that take place immediately after giving birth. In addition, a woman’s depression risk declines after she goes through menopause.
- Chronic illness - The mind & body are clearly linked. If you are experiencing a physical health problem you may discover changes in your mental health as well. The stress of having a chronic illness may trigger an episode of major depression.
- Poor nutrition- A poor diet can contribute to depression in several ways. A variety of vitamin and mineral deficiencies are known to cause symptoms of depression. Diet high in sugar has been associated with depression.
- Substance abuse – Drugs and alcohol can contribute to depressive disorders. But, even some prescriptions drugs have been linked to depression include anticonvulsants, statins, stimulants, benzodiazepines, corticosteroids and beta-blockers.
Art therapy in Depression –
It is important to remember that no single cause of depression acts in isolation.
The healing power of art has long been recognized by artists around the world, but it is now emerging as evidence based therapeutic modality for depression. By creating new avenues for self expression, art therapy helps in managing behaviours, process feelings, reduce stress and anxiety and increase self-esteem.
Homeopathy for Depression –
Classical Homoeopathic Treatment is seen helpful in cases of depression.
हल्ली ' नैराश्य' हे मानसिक असमर्थतेच मुख्य कारण दिसून येत आहे. आज जगातील १०% पेक्षा जास्त लोकसंख्या नैराश्याने ग्रासलेली आहे. नैराश्य हा आजार, शारीरिक लक्षणांपेक्षा विचार, भावना आणि वागणुकीतून लक्षात येतो. मानसिक आजार असल्यामुळे हा समजून घेणं थोडं अवघड जातं.
'नैराश्य' येणं आणि निराश वाटणं यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण तिथेच गोंधळ होण्याची जास्त शक्यता असते. आपल्याला सगळ्यांनाच कधीना कधी उदास वाटतं. कमी मार्क्स मिळणं, नोकरी जाणं, वाद-विवाद इतकंच काय ढगाळ वातावरणात देखील आपल्याला उदास वाटतं. कधी कधी काहीच झालेलं नसतं तरीही आपला मूड जातो. परिस्थिति बदलली की मूड परत ठीक होतो.
नैराश्य - वैद्यकीयदृष्ट्या नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. आणि हा सहजासहजी बरा होत नाही. याचा अटॅक कमीतकमी २ आठवडे असतो आणि तुमचे काम, परस्परसंबंध यावर याचा विपरीत परिणाम होतो.नैराश्य नक्की कशामुळे येते याची ठोस कारण अजून लक्षात आलेली नाहीत. आपली जनुके आणि बाह्यपरिस्थिती यामधील काही किचकट गुंतागुंतीचे संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याचा परिणाम कधी आणि कुठे दिसणार याचे निदान करण्यासाठी आपल्याकडे काहीही चाचणी नाही. नैराश्याची लक्षणे सहजासहजी लक्षात येत नाहीत. त्यामुळे एखादा माणूस वरकरणी आपल्याला ठिकठाक दिसला तरी तो नैराश्याशी प्रचंड झगडत असू शकतो. संशोधनांमध्ये असं लक्षात आलं आहे की मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला , आपण आजारी असून आपणास उपचाराची गरज आहे हे लक्षात यायला सरासरी १० वर्षांचा कालावधी लागतो. मेंदूतील रसायने संतुलित करण्यासाठी औषधे आणि उपचार (थेरपी) दोन्हीचा एकत्रित उपयोग होतो.
नैराश्य हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. याची बरीच कारण असू शकतात आणि बऱ्याचदा आपण ती टाळू शकत नाही.
लक्षणे -
नैराश्याची खूप वेगवेगळी लक्षणे असू शकतात.
भावनिक - उदास वाटणे, राग, अपराधीपणा, निराशा
वागणूक - एकटे राहणे, अशक्तपणा, प्रेरणा नसणे, चंचलता , झोपेच्या तक्रारी, भुकेमध्ये लाक्षणिक बदल
वैचारिक - आत्मविश्वासाचा अभाव, आत्महत्येचे विचार, उत्साह नसणे.
दीर्घकाळ ताण-तणावाचे विविध शरीरसंस्थांवर दूरगामी दुष्परिणाम होतात. जसे- पचनसंस्था, प्रजननसंस्था, हार्ट अटॅक, मेंदूला कमी रक्तपुरवठा होणे.शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूच्या पेशीमध्ये बदल होऊन सततची चिंता, नैराश्य असे मानसिक त्रास जडू शकतात.
ताण-तणाव तर आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत.त्यामुळे आपणच ताण-तणावाचं योग्य नियोजन करायला हवं.आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणजेच पोषक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे. तुमच्या ताणाचं योग्य कारण शोधून तणावमुक्त राहण्यासाठी शक्य तो उपाय केल्यास तुम्ही ताणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवू शकता आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.
वरीलपैकी ५ लक्षणे आढळ्यास तुम्हाला नैराश्य असू शकते.
नैराश्यामुळे मेंदूमध्ये काही बदल घडून येतात. जसे- फ्रॉन्टल लोब (पुढचा भाग) लहान होणे, मेंदूतील रसायनांच्या प्रमाणात बदल होणे. त्यामुळे झोप , भुकेवर परिणाम , हॉर्मोन्सच्या प्रमाणात चढ-उतार . स्ट्रेस हॉर्मोन्सचे प्रमाण वाढणे, थायरॉईड हॉर्मोन्सचे असंतुलन.
कारणे -
जीवशास्त्रीय आणि सामाजिक अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे नैराश्य येऊ शकते.
- अनुवंशिकता
- दुःखद बालपण, काही औषधे, आयुष्यातील ताण- तणाव , आत्मविश्वासाची कमी
- स्त्रियांच्या बाबतीत ज्या ज्या वेळी हॉर्मोन्समध्ये बदल होत असतात त्या त्या वेळी म्हणजेच ऋतुप्राप्ती , गरोदरपण, प्रसूती, राजीनिवृत्ती नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
- प्रसूती आणि थायरॉईड ग्रंथीशी संबंधित आजारामध्ये नैराश्याची शक्यता वाढते. कारण प्रसूतीनंतर हॉर्मोन्समध्ये झपाट्याने बदल घडून येतात. रजोनिवृत्तीनंतर नैराश्याची शक्यता कमी होऊन जाते.
- जुनाट आजार - मन आणि शरीर खरं तर एकच. जर बऱ्याच काळापासून तुम्ही आजारी असाल तर तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. कधी कधी अश्याच जुनाट आजारामुळे नैराश्य येऊ शकते.
- कुपोषण - आहारातील कमतरता तसेच साखरेचे अति प्रमाण यांचा नैराश्याचा जवळचा संबंध आहे.
- सबस्टन्स अबुझ (substance abuse ) - मादक पदार्थ आणि दारू यांच्या सेवनामुळे नैराश्य येते. पण काही विहित (prescibed ) औषधांमुळेदेखील नैराश्य येऊ शकते. जसे- अँटिकनवलसन्ट , स्टॅटिन , बीटा ब्लॉकर्स, कोर्टोकोस्टिरॉईड्स , स्टिमुलंट्स, बेन्झोडिझेपिन्स .
महत्त्वाचे म्हणजे वरिलपकी केवळ एकाच कारणामुळे नैराश्य येऊ शकत नाही.
आर्ट थेरपी
जगभरातल्या कलाकारांनी आधीच ओळखलं होत की, कलेमध्ये बरं करण्याची ताकद आहे. आणि आता, कलेवर आधारित उपचारांना नैराश्याचे रुग्ण खूप चांगला प्रतिसाद देतात, असे दिसून आले आहे. स्वतःला व्यक्त करण्याचे विविध मार्ग उपलब्ध करून देऊन आर्ट थेरपी व्यक्तीच्या भावना तसेच वागणुकीमध्ये बदल घडविणे, ताण-तणाव कमी करणे, आत्मविश्वास वाढवण्यात मदत करते.
नैराश्य आणि होमिओपॅथी
नैराश्याच्या रुग्णांना क्लासिकल होमिओपॅथिक उपचारांचा खूप फायदा होतो.