It is said that PCOS is a lifestyle disease. There is increasing number of cases of PCOS these days. I see many school going girls facing this problem so early in their life now days. I will try to explain you, what exactly means by a lifestyle disease.
We live in 21st century. We have done so many inventions to ease (so called ease..!) our life. But some beliefs are still same. Most women are raised to be a good girl and please the people in their lives. After industrial revolution, women were given the opportunity to do what traditionally been their father’s job, but they’ve maintained what was traditionally their mother’s responsibilities. So what has unfolded for far too many women is a tremendous workload day and night, and this never ends. They so desperately need rest
It can have dire physical, mental and emotional consequences. And it breaks my heart because these women say that they scream at their children and they hate themselves afterwards, that they feel like they have no control over it. They told me that if they don’t do it, it won’t get done. They are exhausted, tiered but wired, that they can’t cope. They wish there were more hours in the day. They can’t remember anything. But they won’t let you see any of that as they keep their smile firmly in place. Why they do it? They do it because they care so much for the people in their life.
How our belief system affects our Health:-
Deeper than that we have made up a story a really long time ago, we are not enough the way we are. We are not good enough, tall enough, slim enough, pretty enough, brainy enough, on time enough that we are just not enough the way that we are. And so we spend our lives trying to please everyone in our realm. Constantly trying to make sure; that they love us, appreciate us. So that we never ever have to feel rejected. If you don’t believe you are enough, you will don’t feel you are enough. So you live your life in the pursuit of having or gaining more and more
But it’s just not the physical health consequences that concern me for women. It’s that they live their life so out of touch with their own desires
and in the cloud of belief that they are not enough. Too many women have lost their sense of place. It’s time to end the cloud of false belief
Our lifestyle has changed a lot in a short period
Just imagine women life in 1919 and in 2019 how much difference in just a century..! In 1919 women were doing the household chorus only. After Independence, women just started to go out for jobs. 1960 fashion came in the picture. 1980 women started entering in all fields with men. Now, in 2019, here comes the super- woman, working day and night and always on her tip of toe. Are you getting, what I want to convey?
We are changing at faster pace. But our body has a million years old mechanism. Imagine driving a car with wheels of bullock-cart. It’s so funny but we are doing it. Yes! Our flight-fight mechanism is millions of year old.
This is not to say that the physical symptoms you experience should only be dealt with from a mental health standpoint. As noted, the physical symptoms of psychosomatic illness are real. The pain you feel in your back isn’t just felt in your brain, but the chemical secretions that begin with stress may lead to actual inflammation in your back muscles
PCOS and Obesity:-
We require different nutrients for different biochemical process to carry out in our body. But in this frantic pace we compromise on our food. When you are in constant anxiety your body has no choice but to believe that your life literally in danger. It needs to power you to get out of that Danger. It needs fuel to get out of danger. Now your body has two fuels- glucose and fat. Which is easy to burn..? Naturally, glucose..! So body uses glucose, we feel drained out; fat remains as it is. So when we are calm we use our body fat more readily as fuel. That is why there is difficulty in losing weight or obesity in PCOS.
PCOS and Infertility:-
Progesterone is a reproductive hormone. It also is anti anxiety agent, anti-depressant and diuretic. We make our progesterone from same place where stress hormone cortisol gets secreted. When we are constantly under stress; body secrets stress hormone cortisol that our life is in danger. So our body feels you are not safe and there is no food. So body shuts down production of progesterone. As there is no reproductive hormone – there are difficulty in pregnancy.
So, my dear friends... There is no need to sacrifice our health to make everybody else happy. It is beautiful to contribute but never at expense of your health. It’s high time now to get back in touch with your own self. Love yourself also – no need to wait for someone to love you. Life is precious and that, you are precious and to treat yourself accordingly.
I want to add further, our society also needs to respect individuality , strengths as well as weaknesses of everyone including men as well as women to have a healthy and happy life.
PCOS हा एक जीवनशैलीशी निगडित आजार आहे. आज-काल PCOS च प्रमाण वाढतच चाललं आहे. हल्ली तर मी बऱ्याचश्या शाळेत जाणाऱ्या मुलींमध्येही हा आजार पाहते. जीवनशैलीशी निगडित म्हणजे नक्की काय ते मी आज समजून देण्याचा प्रयत्न करते.
आज आपण २१व्या शतकात जगतो आहोत. आपलं आयुष्य सहज आणि सुखकर ( खरंच..?) करण्यासाठी आपण लहान-मोठे खूप शोध लावले आहेत. पण आपल्या काही समजुती मात्र अजूनही जुन्याच आहेत. अजूनही बऱ्याच बायकांना सगळ्यांना खुश ठेवणारी , सगळ्यांची काळजी घेणारी, चांगली मुलगी म्हणूनच वाढवलं जातं.
औद्योगिक क्रांतीनंतर महिलांना, परंपरेने पुरुषी असलेल्या क्षेत्रात उतरण्याची संधी दिली गेली. पण परंपरेने महिलांची असलेली कामं मात्र त्यांच्या खाती तशीच राहिली. त्यामुळे बऱ्याचश्या महिला रात्रंदिवस प्रचंड कामाखाली दबलेल्या असतात; जे कधीच संपत नाही. खरं तर त्यांना खूप विश्रांतीची गरज असते. याचे भयंकर शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होऊ शकतात. कारण याच बायका माझ्या क्लीनिक मध्ये मला सांगतात की, त्या त्यांच्या मुलांवर खूप ओरडतात आणि नंतर त्यांना स्वतःचाच खूप राग येतो कारण त्यांचा स्वतःवर ताबाच रहात नाही. त्या मला सांगतात की, जर त्या ओरडल्याच नाहीत तर मुलं ऐकणारच नाहीत. आणि याचा मला खूप त्रास होतो. त्या खूप दमलेल्या असतात,थकलेल्या असतात पण हताश असतात की त्यांना जमतच नाहीये. त्यांना वाटत दिवसाला थोडे जास्त तास असायला हवे होते. त्यांच्या काही लक्षातच रहात नाही. खूप ओढाताण होत असते. पण यातलं काहीच त्या चेहेऱ्यावर आणत नाहीत, चेहेऱ्यावरच हसू तस्संच असतं. का बरं असं करत असतील त्या ? कारण त्यांच्या जवळच्या सगळ्या माणसांची त्यांना काळजी असते.
अजून खोलात जाऊन सांगायचं तर , फार पूर्वीच आपण एक कहाणी रंगवून ठेवलीय. आपण जसे आहोत तसे पुरेसे नाही आहोत. म्हणजे आपण तेवढे चांगले नाही, बारीक नाही , उंच नाही, सुंदर नाही, हुशार नाही, आपण वेळेवर नाही. थोडक्यात काय तर , जसे आहोत तसे आपण पुरेसे नाही. आणि म्हणून आपण आपलं आख्ख आयुष्य जवळच्या सगळ्यांना खुश करण्यात घालवतो. ‘आपण कुणाला नकोसे आहोत’ ही भावना वाटू नये म्हणून सतत प्रयत्न असतात की, इतरांनी आपल्यावर प्रेम करावं, इतरांनी आपलं कौतुक करावं. पण जर तुमचा विश्वासच नसेल की तुम्ही पुरेसे आहात तर तुम्हाला कधी वाटणारच नाही की तुम्ही पुरेसे आहात. मग सगळं आयुष्य काहीतरी मिळवण्याच्या किंवा पूर्ण करण्याच्या पाठी निघून जातं.
खरं तर मन आणि शरीर या वेगवेगळे नाहीतच. अगदी सोप्या उदाहरणाने समजून घ्यायचं तर , ज्याप्रमाणे प्रेशर कुकर मध्ये वाफ कोंडली कि ठराविक वेळेनंतर शिट्टी होते. पण जर आपण शिट्टी होऊ नाही दिली आणि झाकण घट्ट धरून ठेवलं तर मात्र
वाल्व्ह उडतो म्हणजेच कुकरच्या, तुलनेने नाजूक असलेल्या जागेतून वाफ बाहेर पडते. त्याप्रमाणेच आपल्या मनात खूप भावना, विचार कोंडून राहिले. त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे निचरा झाला नाही तर ठराविक मर्यादेनंतर स्फोट होणार हे नक्की ! तुमच्याही शरीरातील तुलनेने नाजूक संस्थेमधून हा स्फोट होण्याची शक्यता असते. जर तुमचं डोकं तुलनेने नाजूक आहे तर तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.त्याचप्रमाणे कुणाला कंबरदुखी तर कुणाला अंगावर पित्त उठू शकतं. कुणाला वारंवार सर्दी - पडसं.अजून खोलात जाऊन सांगायचं तर , फार पूर्वीच आपण एक कहाणी रंगवून ठेवलीय. आपण जसे आहोत तसे पुरेसे नाही आहोत. म्हणजे आपण तेवढे चांगले नाही, बारीक नाही , उंच नाही, सुंदर नाही, हुशार नाही, आपण वेळेवर नाही. थोडक्यात काय तर , जसे आहोत तसे आपण पुरेसे नाही. आणि म्हणून आपण आपलं आख्ख आयुष्य जवळच्या सगळ्यांना खुश करण्यात घालवतो. ‘आपण कुणाला नकोसे आहोत’ ही भावना वाटू नये म्हणून सतत प्रयत्न असतात की, इतरांनी आपल्यावर प्रेम करावं, इतरांनी आपलं कौतुक करावं. पण जर तुमचा विश्वासच नसेल की तुम्ही पुरेसे आहात तर तुम्हाला कधी वाटणारच नाही की तुम्ही पुरेसे आहात. मग सगळं आयुष्य काहीतरी मिळवण्याच्या किंवा पूर्ण करण्याच्या पाठी निघून जातं.
आपली जीवनशैली खूप वेगाने बदलत चाललीय.
जरा कल्पना करा, फक्त १०० वर्षात केवढा फरक पडलाय १९१९ मधल्या आणि २०१९ मधल्या स्त्रीच्या आयुष्यात..! १९१९ मध्ये बायका फक्त घरातील कामे करायच्या. स्वात्रंत्र्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. १९६० नंतर त्या फॅशन करू लागल्या. १९८० नंतर बायका पुरुषांच्या बरोबरीने बऱ्याचशा क्षेत्रात दिसू लागल्या. आणि आता २०१९ मध्ये आहेत त्या अहोरात्र सगळ्या आघाड्यांवर लढणाऱ्या सुपर- वूमन ..! ज्या कुठेही मागे नाहीत. कुठचंही काम करायला त्या बोटांच्या पेरावर तयार असतात. तुमच्या लक्षात येतंय का, मला काय सांगायचंय ?
आपण खूप वेगाने बदलतोय. पण आपल्या शरीरात ताण-तणाव नियंत्रणाची यंत्रणा मात्र लाखो वर्ष जुनीच आहे.. आपण जरी वेगाने बदललो तरी ती इतक्या वेगाने बदलणार नाही. कल्पना करा - बैलगाडीची चाकं लावून आपण चारचाकी चालवतोय. मजेशीर वाटेल पण आपण असंच काहीसं करतोय. आपला flight - fight mechanism लाखो वर्ष जुना आहे.
PCOS आणि लठ्ठपणा -
आपल्या शरीरातील विविध जीव-रासायनिक क्रिया घडवून आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. पण या स्पर्धेच्या वेगवान जगात आपण अन्नाशी तडजोड करतो. जेव्हा तुम्ही सतत तणावाखाली असता तेव्हा तुमच्या शरीराला वाटू लागत की खरोखर तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्या धोक्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज आहे. आता तुम्हाला ताबडतोब इंधन पुरवायला हवं. आपल्या शरीरात दोन प्रकारची इंधनं असतात - साखर आणि चरबी. आता तुम्हीच सांगा ...जाळायला सोप्प काय ? साखर ...बरोबर ! म्हणून शरीर साखर वापरून टाकतं....त्यामुळे आपल्याला लगेच थकवा येतो मात्र चरबी तशीच राहते. आपण जेव्हा शांत असतो तेव्हा चरबी इंधनं म्हणून वापरली जाते. आता येतंय का लक्षात ..कितीही व्यायाम केला तरी चरबी का कमी होत नाही ते? म्हणूनच PCOS मध्ये लठठपणा आढळतो आणि वजन कमी करणे कठीण जाते.
PCOS आणि वंध्यत्व -
प्रोजेस्टेरॉन हा एक रिप्रोडुक्टिव्ह हॉर्मोन आहे. तसाच तो अँटी डिप्रेसंट (नैराश्यविरोधी) , ANti - anxiety (तणाव विरोधी), diuretic (लघवीचे प्रमाण वाढवणारा) म्हणूनही काम करतो. आपल्या शरीरात जिथे प्रोजेस्टेरॉन तयार होतो तिथेच स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल तयार होतो. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपला जीव धोक्यात आहे आणि अन्नाचाही तुटवडा आहे असे शरीराला वाटते आणि स्ट्रेस हॉर्मोन स्रवला जातो. प्रोजेस्टेरॉनची निर्मिती थांबवली जाते. रेप्रोडुक्टिव्ह हॉर्मोनच्या कमतरतेमुळे वंध्यत्व येते.
तर मैत्रिणींनो ...सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याचा बळी देणं चांगलं नाही. स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता इतरांना मदत करणं बरं नाही. वेळ आलीय स्वतःच्या आत डोकावण्याची ....स्वतःवर प्रेम करण्याची..दुसरं कुणी आपली काळजी घेईल असा विचार करत थांबण्याची गरज नाही. जीवन अनमोल आहे आणि तुम्ही स्वतः मौल्यवान आहात हे उमजून वागण्याची खरी गरज आहे.
पुढे जाऊन मी असं म्हणेन की, आपल्या समाजाने प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचा आदर करायला हवा. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला सामर्थ्य आणि दुर्बलतेसह आपण स्वीकारायला हवं. मग आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवन जगात येईल.