Loading...
consultation@drkalyanipatil
Mon - Fri : 10.00 AM - 02.00 PM   &   06.00 PM - 09.00 PM
+91 9152975012

Effect of STRESS on YOU

      Stress is the body’s reaction to any change that requires an adjustment or response. The body reacts with these changes with physical, mental, and emotional responses.

      Anything that puts high demands on you can be stressful. This includes positive events such as getting married, buying a house, going to college, or receiving a promotion or an exhausting work schedule or a rocky relationship.

      Stress can also be internal or self-generated, when you worry excessively about something that may or may not happen, or have irrational, pessimistic thoughts about life.

      Finally, what causes stress depends, at least in part, on your perception of it. Something that’s stressful to you may not be for someone else; they may even enjoy it.

      Your brain comes hard-wired with an alarm system for your protection known as “fight-or-flight mechanism” When your brain perceives a threat, your nervous system responds by releasing a flood of stress hormones, including adrenaline and cortisol, which rouse the body for emergency action. Your heart pounds faster, muscles tighten, blood pressure rises, breath quickens, and your senses become sharper. These physical changes increase your strength and stamina, speed up your reaction time, and enhance your focus—preparing you to either fight or flee from the danger at hand. During Stone Age, The stresses were searching food, killing animal, getting killed by animals or natural calamities. If any wild animal is coming they had only three options – either fight with it. Or run away from it, or to get freeze till the animal goes away. In those days, to choose proper option or sequencing of these options according to the situation, man needed to be alert all the time. As they had to face biological challenges. This continued for millions of years, so our brain comes hard-wired with ‘fight-flight mechanism’.

      Whenever we sense any danger, body throws these responses (fight-or-flight) the hypothalamus gets signals & accordingly the action takes place. Slowly with civilisation, all those stresses were overcome by man. After industrial revolution, there are now stresses like getting a job, sustaining a job, taking home-car, EMI, strained relationships, maintaining status, reaching the office in time..! Now the stressors have changed from biological to psycho-social. But our reactions to these stressors remained same! Excelling in exams, catching a train, getting a promotion, maintaining social status has become a life or death situation for us. Our nervous system isn’t very good at distinguishing between emotional and physical threats. If you’re super stressed over an argument with a friend, a work deadline, or a mountain of bills, your body can react just as strongly as if you’re facing a true life-or-death situation. And the more your emergency stress system is activated, the easier it becomes to trigger, making it harder to shut off. Once the threat is gone, your body is meant to return to a normal, relaxed state. Unfortunately, the nonstop complications of modern life mean that some people's alarm systems rarely shut off.

The effects of chronic stress :

      If you tend to get stressed out frequently, like many of us in today’s demanding world, your body may exist in a heightened state of stress most of the time. And that can lead to serious health problems. Chronic stress disrupts nearly every system in your body. It can suppress your immune system, upset your digestive and reproductive systems, increase the risk of heart attack and stroke, and speed up the aging process. It can even rewire the brain, leaving you more vulnerable to anxiety, depression, and other mental health problems.

      Stress won't disappear from your life. And stress management needs to be ongoing. But by paying attention to what causes your stress and practicing ways to relax, you can counter some of the bad effects of stress and increase your ability to cope with challenges. Maintaining a healthy lifestyle will help you manage stress. Eat a healthy diet, exercise regularly and get enough sleep.

      Art based therapy is a better option as here the primary focus is on the process, which allows a person to discover new insight and meaning that might not be achieved with traditional talk therapy. It is appropriate for all ages; it can enhance a person’s emotional, spiritual, cognitive, and physical well-being. While no talent in

ताण-तणाव आणि आपण

      आजकाल ताण-तणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. ताण-तणाव म्हणजे नक्की काय बरं? मी आणि माझं माझ्याशी असलेलं नातं किंवा मी आणि माझं इतरांशी असलेलं नातं यामध्ये अंतर निर्माण होणं म्हणजे तणाव असं आपल्याला म्हणता येईल. कधी कधी असं होणं नॉर्मल आहे. पण ही अवस्था वारंवार होणं आणि दीर्घकाळ टिकणं यालाच आपण तणाव म्हणू शकतो. ज्या गोष्टींमुळे आपल्यावरील जबाबदाऱ्या वाढतात अशा गोष्टी तणावजन्य असू शकतात. त्यामुळे आनंददायी घटना जसे - लग्न, नवीन घर, बढती. कधी कधी बाह्य घटनांपेक्षा स्वभावामुळेही माणूस तणावात राहू शकतो.जसे- निराशावादी लोक किंवा प्रत्येक गोष्टीचा अति विचार करणारे लोक. या घटनांना शरीराने दिलेला प्रतिसाद हा शारीरिक, मानसिक व भावनिक असू शकतो.

      थोडक्यात काय तर, तुम्ही एखाद्या घटनेकडे कशा तऱ्हेने पाहता यावर तणावाचं असणं अवलंबून आहे. जी गोष्ट तुम्हाला काळजीयुक्त वाटते. ती करताना एखाद्याला मजाही येऊ शकते. उदाहरणार्थ - सभेत स्वतःचा मुद्दा मांडणे.

      ताण-तणावाचा आपलं शरीर प्रतिसाद कसा देतं याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या प्रतिसादांच्या निर्मिती प्रकियेकडे वळावं लागेल.

      लाखो वर्षांपूर्वी म्हणजे आदिमानवाच्या काळात, माणसासमोर जीवशास्त्रीय आव्हाने होती जे त्याच्या अस्तित्वाला मारक होती. त्याला धोका होता तो हिंस्त्र पशु,नैसर्गिक आपत्ती, आणि मानवाच्या इतर टोळ्यांपासून. या आव्हानांचा सामना करायचा तर त्याच्याकडे उपलब्ध पर्याय होते लढणे (fight),पळणे (flight ) किंवा थिजणे (fright ) त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य पर्याय निवडणे आणि प्रतिसाद बदलणे यासाठी शरीरसंस्थांचे दक्ष असणे ही पायाभूत गरज होती. अर्थातच आपल्या शरीराला या प्रक्रियेचा लाखो वर्षांचा सराव आहे. त्यामुळे हे आपल्या अंगवळणी पडली आहे. ज्या ज्या वेळी आपल्या जीविताला धोका आहे अशा संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात त्या त्या वेळी अंतर्स्रावी ग्रंथीकडून stress हार्मोन्स adrenaline आणि cortisol स्रवले जातात. आपलं शरीर emergency action साठी तयार होतं. हृदयाची स्पंदन वाढतात. स्नायू ताठर होतात. रक्तदाब वाढतो. श्वास फुलतो. आपण सावध होतो. या बदलांमुळे ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढते. तुम्ही तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तयार होता. यालाच fight-flight mechanism म्हणतात. ज्या ज्या वेळी आपल्याला धोका जाणवतो त्या त्या वेळी शरीराकडून हे प्रतिसाद दिले जातात.

      काळानुसार मानवाची आव्हानं बदलत गेली. औद्योगिक क्रांतीनंतर तर जीवन खूपच गतिमान झालं. आणि आता आपल्यासमोर आव्हानं आहेत ती नोकरी मिळवणं- टिकवणं, घर घेणं, कर्जाचा हप्ता, generation गॅप, शैक्षणिक स्पर्धा, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक मंदी. म्हणजेच जीवशास्त्रीय आव्हानांचं प्राबल्य कमी आहे पण दैनंदिन आयुष्यात मनो-सामाजिक आव्हानं मात्र वाढली आहेत. जीवशास्त्रीय आव्हानांमध्ये reaction - time (प्रतिसाद देण्यासाठी मिळणार अवधी) अतिशय कमी असतो. मनो-सामाजिक आव्हानांमध्ये तो निश्चितच जास्त मिळतो. बऱ्याचदा मनो-सामाजिक आव्हानांना जीवशास्त्रिय आव्हानं समजण्याची गफलत तर आपण करतोय का? कारण आपला प्रतिसाद मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे. गाडीत सीट पकडणं, परीक्षेत यश मिळवणं, कामाच्या deadline गाठणं आपल्या जीवन मरणाचा प्रश्न बनतात तेव्हा आपला शारीरिक प्रतिसादही तितकाच तत्पर आणि दक्ष होतो. जितकी जास्त तुम्ही ही emergency stress system वापरता तितकी लवकर ती उत्तेजित होते आणि जास्त वेळ ती उत्तेजित राहते.धोका टळल्यानंतर खरं तर शरीर शांत व्हायला हवं. पण आधुनिक युगाच्या सातच्या धावपळीत काही माणसांची ही सिस्टिम चालूच राहते.

दीर्घकाळ ताण-तणावांचे शरीरावरील परिणाम -:

      दीर्घकाळ ताण-तणावाचे विविध शरीरसंस्थांवर दूरगामी दुष्परिणाम होतात. जसे- पचनसंस्था, प्रजननसंस्था, हार्ट अटॅक, मेंदूला कमी रक्तपुरवठा होणे.शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूच्या पेशीमध्ये बदल होऊन सततची चिंता, नैराश्य असे मानसिक त्रास जडू शकतात. ताण-तणाव तर आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत.त्यामुळे आपणच ताण-तणावाचं योग्य नियोजन करायला हवं.आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणजेच पोषक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे. तुमच्या ताणाचं योग्य कारण शोधून तणावमुक्त राहण्यासाठी शक्य तो उपाय केल्यास तुम्ही ताणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवू शकता आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.

      ताण-तणाव तर आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत.त्यामुळे आपणच ताण-तणावाचं योग्य नियोजन करायला हवं.आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणजेच पोषक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे. तुमच्या ताणाचं योग्य कारण शोधून तणावमुक्त राहण्यासाठी शक्य तो उपाय केल्यास तुम्ही ताणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात वाचवू शकता आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकता.

      आर्ट बेस्ड थेरपी Art Based Therapy (कले वर आधारित उपचार ) हा एक उत्तम पर्याय आहे. यात वेगवेगळ्या माध्यमांचा जसे गायन, वादन, चित्रकला,हस्तकला, कसरत, गोष्टी,खेळ, ध्यान यांचा उपयोग तुमच्याशी संवाद साधण्यासाठी केला जातो. तुमचे विचार आणि भावना तुमच्या कलाकृतीमार्फत तुम्ही थेरपिस्ट कडे पोचवता.सर्व वयोगटांसाठी ही उपचारपद्धती वापरता येते. आर्ट बेस्ड थेरपी मुळे तुमचे भावनिक, बौद्धिक,अध्यात्मिक, शारीरिक आरोग्य सुधारते.आणि गंमत म्हणजे यासाठी तुम्ही स्वतः कलाकार असण्याची काहीच गरज नाही!